जयललितांचं निवासस्थान बनणार संग्रहालय

By admin | Published: February 9, 2017 04:56 PM2017-02-09T16:56:11+5:302017-02-09T16:57:29+5:30

जयललिता यांचं पोएस गार्डन परिसरातील निवासस्थान असलेलं वेद निलायमचं रुपांतर संग्रहालयात करण्यात येणार असल्याची माहिती तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी दिली आहे

Museum to become the home of Jayalalitha | जयललितांचं निवासस्थान बनणार संग्रहालय

जयललितांचं निवासस्थान बनणार संग्रहालय

Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 9 - जयललिता यांचं पोएस गार्डन परिसरातील निवासस्थान असलेलं वेद निलायमचं रुपांतर संग्रहालयात करण्यात येणार असल्याची माहिती तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी दिली आहे. यासाठी जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची सुत्रे हाती घेतलेल्या शशिकला यांच्याविरोधात निदर्शन करण्यात येणार असल्याचं पनीरसेल्वम यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत शशिकला आणि त्यांचे नातेवाईक घरावरील ताबा सोडत नाहीत तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असं पनीरसेल्वम बोलले आहेत. 
 
(जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी होणार)
(75 दिवसात जयललितांना एकदाही भेटू दिले नाही - पनीरसेल्वम)
 
या संग्रहालयात अम्मांच्या सर्व आठवणी जपून ठेवण्यात येतील, जेणेकरुन सर्व वयोगटातील लोकांना त्या पाहता येतील असं पनीरसेल्वम यांनी सांगितलं आहे. 
 
पोएस गार्डन परिसरातील वेद निलायम हा बंगला गेल्या 25 वर्षांपासून सत्तेचं केंद्र ठरला आहे. 2016 विधानसभा निवडणुकीत जयललिता यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती त्यामध्ये या बंगल्याचाही उल्लेख होता. 2011 मध्ये या बंगल्याची किंमत 20 कोटी 16 लाख होती, जी 2016 मध्ये 43 कोटी 96 लाखांवर पोहोचली होती. 
 

Web Title: Museum to become the home of Jayalalitha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.