संगीत सेरेमनी, गृहपूजा, 2 रिसेप्शन अन्...; असा आहे अनंत-राधिकाच्या 14 जुलाईपर्यंत चालणाऱ्या लग्नसोबळ्याचा संपूर्ण कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 05:44 PM2024-07-05T17:44:37+5:302024-07-05T17:45:49+5:30

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्याच्या शेड्यूलसंदर्भात बोलायचे झाल्यास, 3 जुलैपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 12 जुलैला हे दोघे लग्न बंधनात अडकतील आणि 14 जुलैपर्यंत इतर कार्यक्रम चालतील.

Music ceremony, home worship, 2 receptions and...; This is the complete schedule of Anant-Radhika's wedding which will last till 14th July | संगीत सेरेमनी, गृहपूजा, 2 रिसेप्शन अन्...; असा आहे अनंत-राधिकाच्या 14 जुलाईपर्यंत चालणाऱ्या लग्नसोबळ्याचा संपूर्ण कार्यक्रम

संगीत सेरेमनी, गृहपूजा, 2 रिसेप्शन अन्...; असा आहे अनंत-राधिकाच्या 14 जुलाईपर्यंत चालणाऱ्या लग्नसोबळ्याचा संपूर्ण कार्यक्रम

भारतातील प्रसिद्ध उदयोगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची माहिती समोर आली आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंबानी कुटुंबाने सर्वप्रथम 50 जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. यानंतर अँटिलियामध्ये मोमारू विधी संपन्न झाला. तर आता जाणून घेऊयात, 5 ते 14 जुलैपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात.

3 जुलैपासूनच कार्यक्रमांना सुरुवात -
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्याच्या शेड्यूलसंदर्भात बोलायचे झाल्यास, 3 जुलैपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 12 जुलैला हे दोघे लग्न बंधनात अडकतील आणि 14 जुलैपर्यंत इतर कार्यक्रम चालतील. दोन प्री-वेडिंग फंक्शननंतर, हे दोघे मुंबईतच लग्न बंधनात अडकणार आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोबळ्यात 5 जुलैपासून प्री-वेडिंग कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. शुक्रवारी रात्री संगीत सेरेमनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इंटरनॅशनल स्टार जस्टिन बिबर भारतात आला आहे. या कार्यक्रमासाठी बॉलीवुडचे लोकही येण्याची शक्यता आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याचा संपूर्ण शेड्यूल असा -
माध्यमांतील वृत्तांनुसार, 3 जुलैला मामेरू आणि गरबा नाइट पार पडले. 5 जुलैला संगीत सेरेमनी,  8 जुलैला गृह पूजा, 10 जुलैला शिव पूजा, 10 जुलैलाच रात्रीच्या सुमारास यंगस्टर्स पार्टी 12 जुलैला शुभ विवाह, यानंतर 13 जुलैला आशीर्वाद समारंभ, यालाच  मिनी रिसेप्शन म्हटले जात आहे. तर 14 जुलैला दुसरे रिसेप्शन असणार आहे.

जस्टिन बिबरची फीस जाणून थक्क व्हाल -
'द फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या विवाह कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन जवळपास 10 मिलियन डॉलर, भारतीय चलनाचा विचार करता, जवळफास 83 कोटी रुपये घेत आहे. जस्टिन बिबर शिवाय इतरही काही परदेशी सिंगर देखील लग्न आणि संबंधित कार्यक्रमांत परफॉर्म करण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अडेल, ड्रेक आणि लाना डेल रेल याच्यासोबत बोलणी सुरू आहे.

 

Web Title: Music ceremony, home worship, 2 receptions and...; This is the complete schedule of Anant-Radhika's wedding which will last till 14th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.