परदेशात शिकण्यासाठी तरुणीने मागितली 23 लाखांची मदत, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:49 PM2022-07-17T17:49:23+5:302022-07-17T17:50:02+5:30

चंडीगडला राहणाऱ्या एका तरुणीने परदेशात शिकण्यासाठी क्राऊडफंडिंगद्वारे आर्थिक मदत मागितली आहे.

Muskaan Bawa crowdfunding campaign ; girl trolled for asking donations to study in foreign country | परदेशात शिकण्यासाठी तरुणीने मागितली 23 लाखांची मदत, सोशल मीडियावर झाली ट्रोल

परदेशात शिकण्यासाठी तरुणीने मागितली 23 लाखांची मदत, सोशल मीडियावर झाली ट्रोल

Next


चंदीगड: आजकाल क्राउडफंडिंग करणे ही एक सर्वसामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदत घेणे. सध्या क्राउडफंडिंगसाठी अनेक वेबसाइट्स मदत करतात. पैसे उभारण्याची ही पद्धत बऱ्याच काळापासून आजारी लोकांसाठी वापरली जाते. गरीब किंवा गरजू लोक, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे, ते अशा प्रकारे पैसे गोळा करून उपचार घेतात.


शिक्षणासाठी तरुणीने मागितली मदत
पण, क्राउडफंडिंगची करणारी एक तरुणी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. तिने आपली एक गरज पूर्ण करण्यासाठी लोकांकडे आर्थिक मदत मागितली. पण, तिने आजारावर उपचार करण्यासाठी नाही, तर परदेशात जाऊन मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेण्यासाठी लोकांची मदत मागितली आहे! चंदीगडमध्ये राहणारी मुस्कान बावा गेल्या काही दिवसांपासून क्राउडफंडिंग मोहीम राबवत आहे. पण, यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. मुस्कानने केटो नावाच्या क्राउडफंडिंग वेबसाइटद्वारे लोकांकडून मदत मागितली आहे.

तरुणीने केली 23 लाख रुपयांची मागणी
मुस्कानच्या पोस्टनुसार, तिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिला मानव विकास आणि शिक्षण क्षेत्रात मास्टर्स शिकण्यासाठी तिथे जायचे आहे. तिने सांगितले की, तिने काही जवळच्या व्यक्तींकडून आणि हार्वर्ड क्रेडिट युनियनकडून कर्ज घेतले आहे. तिने अनेक काही संस्थांमध्ये 4 वर्षे कामही केले, पण तिच्याकडे हार्वर्डमध्ये जाण्याइतके पैसे नाहीत. तेथे गेल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कर्ज आणि अर्धवेळ काम करण्याचेही ठरवले आहे, परंतु पैसे कमी असल्याने ती लोकांची मदत घेत आहे. या साइटच्या माध्यमातून मुस्कानला 23 लाख रुपये जमवायचे आहेत, त्यापैकी 13 लाख रुपयांची मदत अनेकांनी केली आहे.

सोशल मीडियावर तरुणी ट्रोल
तिच्या या क्राउडफंडिंगचे प्रमोशन अनेक सोशल मीडिया पेजेसने सुरू केले आहे. पण, तेव्हापासून ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. लोक म्हणत आहेत की, भारतात अनेक मोठ्या संस्था आहेत, तिच्याकडे पैसे नसतील तर तिने इतरांचे पैसे खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या पैशाने भारतातील मोठ्या संस्थेत शिकावे. ही देणगीची थट्टा असल्याचेही अनेकजणांचे मत आहे.

Web Title: Muskaan Bawa crowdfunding campaign ; girl trolled for asking donations to study in foreign country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.