भारतीय कर्मचाऱ्यांना मस्क यांचा धक्का; ट्विटरच्या ३ पैकी दाेन कार्यालयांना टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:38 PM2023-02-18T13:38:56+5:302023-02-18T13:39:25+5:30
ट्विटरच्या ३ पैकी दाेन कार्यालयांना टाळे, उरले अवघे तीन कर्मचारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : साेशल मायक्राेब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ट्विटरने भारतात कर्मचारी कपात केल्यानंतर आता आणखी एक माेठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतातील ३ पैकी दाेन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कार्यालयात पाेहाेचल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
भारतात कंपनीचे केवळ ३ कर्मचारी शिल्लक आहेत. त्यांना वर्क फ्राॅम हाेम देण्यात आले आहे. ट्विटरचे मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू येथे कार्यालये हाेती. त्यापैकी केवळ बंगळुरू येथील कार्यालय सुरू राहणार आहे. तीन कर्मचाऱ्यांमध्ये एक कंट्री हेड आहेत. तर एकाकडे उत्तर आणि पूर्व तर दुसऱ्याकडे पश्चिम आणि दक्षिण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बंगळुरूतील कार्यालय काेणासाठी?
सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम हाेम दिले आहे.
मात्र, अमेरिकेतील कार्यालयात रिपाेर्टिंग असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंगळुरूतील कार्यालयात यावे लागेल.
हे कर्मचारी भारतीय टीमचा भाग राहणार नाहीत.