दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

By Admin | Published: April 14, 2016 12:58 AM2016-04-14T00:58:37+5:302016-04-14T00:58:37+5:30

मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या

Muslim aggression has been successful by denying weapons to Dalits | दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

googlenewsNext

नवी दिल्ली : मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या विचारांशी जवळीक दाखविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे ‘आॅर्गनायझर’ या मुखपत्रातील ताज्या लेखावरून स्पष्ट होते.
भारतीय समाजातील बहुतांश घटकांना शस्त्रे बाळगता येत नव्हती. दलितांना नि:शस्त्र ठेवले जात होते. त्यांना रणांगणात लढण्याची परवानगी दिली जात नव्हती, त्यामुळेच त्या काळी विदेशींनी किंवा मुुस्लिमांनी भारतावर केलेली आक्रमणे यशस्वी झाली, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत योग्य असल्याचा दावा साप्ताहिक ‘आॅर्गनायझर’ने नुकत्याच प्रकाशित अंकात केला आहे.
अस्पृश्यांना शस्त्रांपासून वंचित ठेवण्यात आले नसते तर या देशावर विदेशी लोकांनी राज्य केले नसते, असे आंबेडकरांचे विधान या लेखात नमूद केले आहे. संपूर्ण देशभरात डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.

मुखपृष्ठात सामाजिक योगदानाची दखल...
आॅर्गनायझरच्या मुखपृष्ठ लेखात (कव्हर स्टोरी) डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानाची विस्तृत माहिती दिलेली आहे. ते वंचित आणि कमकुवत घटकांसाठी कसे लढले, याचा तपशीलही त्यात आहे. भारताची लोकशाही आणि राष्ट्रवादाला सामाजिक-आर्थिक आधारावर नवे परिमाण मिळवून देण्यात आंबेडकरांचे योगदान एकमेवाद्वितीय होते. समाजातील तळागाळाच्या घटकांना आत्मसन्मान मिळाल्याखेरीज देश उभा ठाकणार नाही, हे डॉ. आंबेडकरांचे विचार होते, असेही त्यात म्हटले आहे.

दलितप्रेमाचे कारण काय?
हिंदूंना एकजूट करण्याच्या व्यापक योजनेंतर्गत दलितांना आपल्याकडे ओढत त्यांचे ख्रिश्चनांमध्ये होणारे धर्मांतर टाळण्यासह मुस्लिम संघटनांनी अनुसूचित जातींसोबत आघाडी स्थापन करू नये या हेतूने संघाने दलितांकडे लक्ष केंद्रित केले असावे, असे विश्लेषकांना वाटते.

Web Title: Muslim aggression has been successful by denying weapons to Dalits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.