तर मुस्लिम देशात आझम खान यांचा झाला असता शिरच्छेद - स्वामी

By admin | Published: June 29, 2017 06:36 PM2017-06-29T18:36:43+5:302017-06-29T18:36:43+5:30

लष्करावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते आझम खान यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज जोरदार

In the Muslim country, when Azam Khan was elected, Shirkhaar - Swamy | तर मुस्लिम देशात आझम खान यांचा झाला असता शिरच्छेद - स्वामी

तर मुस्लिम देशात आझम खान यांचा झाला असता शिरच्छेद - स्वामी

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 -  लष्करावर आक्षेपार्ह भाषेत टीका  करणारे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते आझम खान यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आझम खान यांनी जर मुस्लिम राष्ट्रामध्ये असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद झाला असता, असा टोला स्वामी यांनी लगावला. लष्करातील जवान बलात्कारी असल्याने महिला दहशतवादी लष्कर जवानांचे गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले. हात किंवा शीर  न कापता शरीरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती, तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून, संपूर्ण देशाला याची लाज वाटली पाहिजे, असे आझम खान म्हणाले होते.
 
आझम खानांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना स्वामी म्हणाले, "आझम खानसारख्या लोकांना चर्चेत राहायचे असते. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. आझम खान नेहमीच अशी वाह्यात वक्तवे करत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद केला गेला असता, किंवा त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले असते." 
 
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनीही आझम खान यांच्यावर टीका केली आहे. आझम खान यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि बाष्कळपणाचे आहे, त्यांची ती सवयच आहे. याआधीही त्यांनी भारतमातेचा उल्लेख डायन असा केला होता. त्यांनी पालनपोषण केलेली माणसे पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडली गेली आहेत. माहीत नाही अशा माणसाला देश का सहन करत आहे, असे अमर सिंह म्हणाले.  
 

Web Title: In the Muslim country, when Azam Khan was elected, Shirkhaar - Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.