शहरातील शांतता व बंधुभाव कायम टिकवा मुस्लीम नेत्यांचे आवाहन : हिंसेला मार्ग न पत्करता संविधानिक मार्गाने लढा

By admin | Published: June 25, 2016 11:04 PM2016-06-25T23:04:02+5:302016-06-25T23:04:02+5:30

जळगाव : व्हॉटस् ॲपवर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे शहरातील शांतता व बंधुभावाला तडा गेला आहे. या मजकुराचे समर्थन कोणीच करणार नाही, मात्र अशा घटनामध्ये हिंसेचा मार्ग न पत्करता संविधानिक मार्गाने लढावे. शहरातील शांतता व बंधुभाव कायम टिकवावा असे आवाहन शहरातील प्रमुख मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी केले आहे.

Muslim leaders urged to maintain peace and brotherhood in the city: fight constitutionally for non-violence | शहरातील शांतता व बंधुभाव कायम टिकवा मुस्लीम नेत्यांचे आवाहन : हिंसेला मार्ग न पत्करता संविधानिक मार्गाने लढा

शहरातील शांतता व बंधुभाव कायम टिकवा मुस्लीम नेत्यांचे आवाहन : हिंसेला मार्ग न पत्करता संविधानिक मार्गाने लढा

Next
गाव : व्हॉटस् ॲपवर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे शहरातील शांतता व बंधुभावाला तडा गेला आहे. या मजकुराचे समर्थन कोणीच करणार नाही, मात्र अशा घटनामध्ये हिंसेचा मार्ग न पत्करता संविधानिक मार्गाने लढावे. शहरातील शांतता व बंधुभाव कायम टिकवावा असे आवाहन शहरातील प्रमुख मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी केले आहे.
निंदनीय घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्याची तत्काळ दखल घेत गुन्हे दाखल करून दोषींना अटक केली, त्याबद्दल पोलीस दलाचेही या नेत्यांनी आभार मानले आहेत.भविष्यात सुध्दा अशा असामाजिक तत्त्वावर नजर ठेवावी, विशेषत: युवकांनी संयम बाळगावा, कायदा हातात घेऊ नये.सोशल मीडियावर येणार्‍या मजकुराची शहानिशा करा. बर्‍याचवेळा नजरचुकीनेही अशा घटना घडू शकतात. एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणेही चुकीचेच आहे, असेही या नेत्यांनी म्हटले आहे.
माजी उपमहापौर करीम सालार, गफ्फार मलिक, मो.फारुख अब्दुल्ला, फहीम पटेल, अ.गनी पिंजारी, सैयद अय्याज अली, खालीद बागवान, अमीन बादलीवाला, गनी मेनन, इब्राहीम मुसा पटेल, अमजद पठाण, इकबाल पिरजादे, सै.शकील पठाण, डॉ.इकबाल शहा, अफजल खान पठाण, मो.सादीक खाटीक, मो.मेहमूद शेख, खलील पापामियॉँ शेख आदींच्या प्रसिध्दी पत्रकावर स‘ा आहेत.

Web Title: Muslim leaders urged to maintain peace and brotherhood in the city: fight constitutionally for non-violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.