भाजपाची लाट आलेल्या उत्तर प्रदेशात मुस्लिम आमदार घटले
By admin | Published: March 13, 2017 12:54 AM2017-03-13T00:54:08+5:302017-03-13T00:54:08+5:30
उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १९ टक्के असूनही यंदाच्या विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६९ वरून घटून २४ वर आली आहे. २०१२ मध्ये विधानसभेत ६९ मुस्लिम आमदार होते.
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १९ टक्के असूनही यंदाच्या विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६९ वरून घटून २४ वर आली आहे. २०१२ मध्ये विधानसभेत ६९ मुस्लिम आमदार होते.
राज्यात मुस्लिम मतदार लक्षणीय संख्येत आहेत व भाजपने ४०३ सदस्य संख्येच्या विधानसभेत एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नव्हती. पश्चिम उत्तर प्रदेश, रोहिलखंड, तेराई आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. मुस्लिम, यादव व दलित हे अनुक्रमे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे मतदार होते. या जातींच्या संख्येमुळेच राजकीय पक्षांना उमेदवार निवडताना काळजी घ्यावी लागायची.
मुस्लिम मतदारांनी भाजपच्याविरोधात मते द्यायला प्राधान्य दिल्याचा परिणाम हा हिंदू मते भाजपच्या बाजुने गोळा झाली, हे मोजक्या मुस्लिमांनी मान्य केले. समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत युती करण्याचा मुख्य उद्देशच मुस्लिम मते इतरत्र जाऊ नयेत यासाठी होता. मुस्लिम मते समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात विभागली जाऊन त्याचा लाभ भाजपला मिळेल, अशीही भीती होती.
भाजपने धार्मिक भावनांना हात घालण्याचे नेहमीचे प्रयोगही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘रमझानविरुद्ध दिवाळी’ वक्तव्य समाजवादी पक्षाकडून हिंदुंना अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचे सूचित करणारे होती.