मुस्लिम मित्राने कायम केलं एकतेचं उदाहरण, हिंदू मित्राला किडनी देऊन वाचवला त्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:30 PM2022-03-18T12:30:22+5:302022-03-18T12:37:43+5:30

West Bengal : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात सामाजिक एकतेचं उदाहरण देत एका मुस्लिम व्यक्तीने त्याच्या हिंदू सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दान देण्यााचा निर्णय घेतला.

Muslim man decided to donate kidney to his Hindu friend in west bengal | मुस्लिम मित्राने कायम केलं एकतेचं उदाहरण, हिंदू मित्राला किडनी देऊन वाचवला त्याचा जीव!

मुस्लिम मित्राने कायम केलं एकतेचं उदाहरण, हिंदू मित्राला किडनी देऊन वाचवला त्याचा जीव!

googlenewsNext

एकीकडे 'द काश्मीर फाइल्स' सिनेमामुळे हिंदू-मुस्लिम असा वाद सोशल मीडियावर पेटलेला असताना दुसरीकडे जात-धर्म सोडून माणुसकीचं एक उदाहरण बघायला मिळालं आहे. काही लोकांसाठी धर्म द्वेष महत्वाचा असू शकतो पण सगळे लोक तसे नसतात. लोकांच्या मनात आजही माणुसकी जिवंत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) एका मुस्लिम व्यक्तीने माणुसकी आणि बंधूता याचं उदाहरण (Muslim Man Donate his Kidney to Hindu Frind) कायम केलं आहे.

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात सामाजिक एकतेचं उदाहरण देत एका मुस्लिम व्यक्तीने त्याच्या हिंदू सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. हसलू मोहम्मद नावाच्या व्यक्तीने राज्य आरोग्य विभागाकडे अर्ज करून अवयव दानाची परवानगी घेतली. तेव्हा नियमानुसार आरोग्य विभागाने स्थानिक पोलिसांना चौकशी करण्यासाठी पाठवलं की, तो आपली किडनी बेकायदेशीरपणे पैशांच्या बदल्यात तर देत नाहीये ना. पोलिसांनी असं काही नसल्याचा रिपोर्ट दिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, लवकरच याबाबतचा रिपोर्ट आरोग्य विभागाला दिला जाईल.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हसलू मोहम्मद आणि अचिंत्य बिस्वास यांच्यात सहा वर्षाआधी मैत्री झाली होती. तेव्हा एका छोट्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करत होते. दोन वर्षाआधी हसलूने नोकरी सोडली आणि आपला स्वत:चा व्यवसाय सुर केला. काळानुसार त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली.

जेव्हा हसलूला समजलं की, त्याचा खास मित्र अडचणीत आहे तर तो त्याच्या मदतीसाठी पुढे आला. हसलू म्हणाला की, 'जेव्हा मला समजलं की, अचिंत्यला तात्काळ ट्रान्सप्लांटची गरज आहे. तर मी माझी एक किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. असं करून मी मरणार नाही. मात्र अचिंत्यला एक नवं जीवन मिळेल'.

धार्मिक सन्मानाबाबात विचारलं तर हसलू म्हणाला की, मानवी जीवन सर्वात किंमती आहे. तो म्हणाला की, 'आमचा धर्म वेगळा असू शकतो, पण आमचा ब्लड ग्रुप एकच आहे'. तेच हसलूची पत्नी मनोरा म्हणाली की, तिच्या पतीने तेच केलं एका मनुष्याने करायला पाहिजे. दोघांना एक ५ वर्षांचा आणि ७ वर्षांचा मुलगा आहे.

२८ वर्षीय अचिंत्यला डायलिसिससाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला आठ वर्षांचा मुलगा आहे. अचिंत्य म्हणाला की, 'हसलूने केवळ माझा जीव वाचवण्यासाठी इतकं मोठं बलिदान देण्याचा निर्णय घेतला. मी आणि माझा परिवार त्याचे नेहमी आभारी राहू. जर तो पुढे आला नसता तर माझ्या मृत्यूनंतर माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं'.
 

Web Title: Muslim man decided to donate kidney to his Hindu friend in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.