मुस्लिम संघटनांनी संघाला विचारले ६ प्रश्न

By admin | Published: February 18, 2015 01:31 AM2015-02-18T01:31:49+5:302015-02-18T01:31:49+5:30

मुस्लिम संघटनांनी संघाला ६ प्रश्न विचारले़ यात संघाला मुस्लिमांकडून कशा प्रकारचे राष्ट्रप्रेम अपेक्षित आहे, हा प्रश्नाचा समावेश आहे़

Muslim organizations asked the team 6 questions | मुस्लिम संघटनांनी संघाला विचारले ६ प्रश्न

मुस्लिम संघटनांनी संघाला विचारले ६ प्रश्न

Next

कानपूर : विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांची रोज नवी वादग्रस्त वक्तव्ये व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याचा जाहीरपणे व्यक्त केलेला संकल्प या पार्श्वभूमीवर मुस्लिम संघटनांनी संघाला ६ प्रश्न विचारले़ यात संघाला मुस्लिमांकडून कशा प्रकारचे राष्ट्रप्रेम अपेक्षित आहे, हा प्रश्नाचा समावेश आहे़
हिंदू-मुस्लिम समुदायात परस्पर सामंजस्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाअंतर्गत विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी रात्री संघाचे प्रतिनिधी इंद्रेश यांच्याशी चर्चा केली़ यात सुन्नी उलेमा कौन्सिलचे महासचिव मोहंमद सलीस, हाजी मोहंमद इक्बाल आदींचा समावेश होता़ या संघटनांनी आपली बाजू मांडण्यासाठी गत १४ फेबु्रवारीला सरसंघचालकांच्या भेटीची वेळ मागितली होती़ मात्र मुस्लिम संघटनांना सरसंघचालकांची भेट नाकारून त्यांचे प्रतिनिधी म्हणून इंद्रेश यांना चर्चेसाठी नेमले होते. काही संघटना संघाच्या प्रतिनिधीला भेटल्या असल्या तरी शहर काझी आलम रझा नूरी यांनी या भेटीतून काहीही हाशील होणार नसल्याचे म्हटले आहे़

1 रा. स्व. संघ भारताला हिंदूराष्ट्र मानते का?
2 हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी काही विशेष आराखडा तयार आहे का?
3 पवित्र हिंदू ग्रंथानुसार हिंदूराष्ट्र साकारले जाईल की, यासाठी नवे तत्त्व स्वीकारणार आहे?
4 मुस्लिमांकडून संघाला कुठल्या प्रकारे देशप्रेम अपेक्षित आहे?
5 संघ ‘इस्लाम’कडे कुठल्या भावनेतून बघतो?
6 धर्मांतरातून संघाला काय अपेक्षित आहे़

Web Title: Muslim organizations asked the team 6 questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.