'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 06:01 PM2024-07-17T18:01:07+5:302024-07-17T18:03:48+5:30

"आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे."

'Muslim population has reached 40 percent in Assam', claims CM Himanta Biswa Sarma | 'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

भाजप नेते तथा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (17 जुलै) राज्यातील बदलत्या 'डेमोग्राफी' वर मोठे वक्तव्य केले आहे. आसाममध्येमुस्लीम लोकसख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचल्याचा दावा हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या एक सभेदरम्यावन आले आहे. सीएम सरमा हे झारखंडमध्ये भाजपचे सह प्रभारीही आहेत.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आसामच्या डेमोग्राफीत अथवा लोकसख्येत झालेला बदल हा माझ्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे."

लोकसभा निवडणुक काळात घडलेल्या घटना चिंतेचा विषय - 
कुठल्याही धर्माचे नाव न घेता मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "कोणताही गुन्हा कुण्या एखाद्या विशिष्ट धर्माकडून गेला जातो, असे मी म्हणत नाही. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घटना चिंतेचा विषय आहे." यापूर्वी 23 जून रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला होता की, बांगलादेशी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले होते. केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मतदान केले.

बांगलादेशी वंशाचे अल्पसंख्याक हा एकमेव समुदाय असा आहे, जो राज्यात जातीयवादात गुंतला आहे, असा दावाही सरमा यांनी केला होता. आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत 24 पैकी 15 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर 3 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत.

Web Title: 'Muslim population has reached 40 percent in Assam', claims CM Himanta Biswa Sarma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.