भाजपाच्या यादीत मुस्लीम नाही
By admin | Published: January 26, 2017 01:32 AM2017-01-26T01:32:18+5:302017-01-26T01:32:18+5:30
‘मुस्लीम समुदायाच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात मी कम्प्युटर पाहू इच्छितो’ एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी स्वत: हे विधान काही महिन्यांपूर्वी केले होत.
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
‘मुस्लीम समुदायाच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात मी कम्प्युटर पाहू इच्छितो’ एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी स्वत: हे विधान काही महिन्यांपूर्वी केले होत. मात्र मोदी आणि अमित शाह यांच्या भाजपचा मुस्लीम समुदायावर अजिबात विश्वास नाही, याची प्रचिती उत्तर प्रदेशात भाजपच्या तिकिटवाटपावरून आली आहे.
उत्तरप्रदेशात भाजपने आजवर ३७१ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. २0 जागा सहयोगी पक्षांसाठी सोडल्या आहेत. भाजपने आपल्या यादीत मात्र एकही मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवलेला नाही. लोकसभा २0१४ च्या निवडणुकीत देखील उत्तर प्रदेशात भाजपचे सर्वाधिक म्हणजे ७१ खासदार निवडून आले. त्यापैकी एकही खासदार मुस्लीम नाही. उत्तर प्रदेशात जवळपास १८ ते १९ टक्के मुस्लीम मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत देशभर विविध राज्यात अनेक मुस्लिमांनी भाजपला मतदान केल्याची बाब भाजपचे नेतेच गौरवाने सांगतात. तथापि हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपला मुस्लिमांचे आकर्षण नाही.