देशात कब्रस्तान नको मुस्लिमांचंही दहन करा- साक्षी महाराज
By admin | Published: February 28, 2017 06:26 PM2017-02-28T18:26:50+5:302017-02-28T18:26:50+5:30
नेहमी आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा वादात
Next
ऑनलाइन लोकमत
एटाह, दि. 28 - नेहमी आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा वादात आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या एका सभेमध्ये हिंदूंच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी अपुरी पडत असल्याचा उल्लेख केला होता. या मुद्याला साक्षी महाराज यांनी आपल्या विधानाने आणखी हवा दिली आहे.
देशात जवळपास 20 कोटी मुस्लिम नागरिक आहेत. प्रत्येकाची कबर बांधायची असल्यास जागा कशी उपलब्ध होणार? त्यामुळे संन्यासी असो किंवा मुसलमान प्रत्येकाचं दहन करुन अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलं आहे. इतर मुस्लिमबहुल देशांमध्ये दफन केलं जात नाही तर मृतदेहांना अग्नि दिला जातो असं ते म्हणाले.
याशिवाय, पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही. दफनभूमी बनवण्याची आवश्यकताच काय आहे? दफनभूमीतच भारतातली सगळी जमीन व्यापली, तर शेतं कुठे होणार?’ असा सवाल त्यांनी विचारला. मुसलमानांसह साधूंचीही समाधी बांधली जाते परिणामी जागा कमी पडत आहे. सर्वांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे, मग तो संन्यासी असो किंवा मुसलमान असं ते म्हणाले.
Chaahe naam kabristan ho, chaahe shamshan ho, daah hona chahiye, kisi ko gaadne ki aveshyakta nahin hai: Sakshi Maharaj, BJP pic.twitter.com/zbwLzrqeVn
— ANI UP (@ANINewsUP) February 28, 2017