मुस्लिमांना भारतात राहण्याचा हक्कच नाही- विनय कटियार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 11:58 AM2018-02-07T11:58:15+5:302018-02-07T12:12:58+5:30
लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता.
भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवणाऱ्यांना तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेचा कायदा सरकारने करावा, अशी मागणी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी केल्यानंतर हिंदुत्त्ववादी नेते आक्रमक झाले आहेत. ओवेसींच्या या वक्तव्यानंतर भाजपा खासदार विनय कटियार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुस्लिमांना या देशात राहण्याचा हक्कच नसल्याचे म्हटले. मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. मग मुस्लिमांनी भारतात राहण्याची आवश्यकताच काय आहे?, असा सवालही कटियार यांनी उपस्थित केला.
Doosri baat ye hai, Musalman iss desh mein rehna hi nahi chahye, unhone jansankhya ke aadhaar par desh ka batwara kardia toh iss desh mein rehne ki kya avashyakta thi? Unko alag bhu-bhaag de dia gaya, Bangladesh ya Pakistan jaayen yahan kya kaam hai unka? : BJP MP Vinay Katiyar pic.twitter.com/VXMw6rSx9X
— ANI (@ANI) February 7, 2018
Doosri baat ye hai, Musalman iss desh mein rehna hi nahi chahye, unhone jansankhya ke aadhaar par desh ka batwara kardia toh iss desh mein rehne ki kya avashyakta thi? Unko alag bhu-bhaag de dia gaya, Bangladesh ya Pakistan jaayen yahan kya kaam hai unka? : BJP MP Vinay Katiyar pic.twitter.com/VXMw6rSx9X
— ANI (@ANI) February 7, 2018
मुस्लिमांना वेगळा भूभाग देण्यात आला असल्याने भारतामधील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात राहायला जावे. ते भारतात असण्याची कोणतीही आवश्यकत नाही, असेही कटियार यांनी म्हटले. याशिवाय, भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवऱ्यांना कारावासाची शिक्षा व्हावी, या ओवेसींच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला. ओवेसी जर अशी मागणी करत असतील तर या देशात वंदे मातरम् आणि राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणाऱ्यांविरोधातही कायदा करावा, असे कटियार यांनी सांगितले.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांच्या बाजूने कायदा तयार करण्याची मागणी बुधवारी लोकसभेत केली. त्यांनी म्हटले की, असा कायदा आणला गेला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही भारतीय मुस्लिमाला पाकिस्तानी संबोधल्यास तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद असावी. पण केंद्रातील भाजपा सरकार असं कोणतंही विधेयक आणणार नाही'. पुढे ते बोललेत की, 'भारतात जे मुस्लिम आहेत त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दोन राष्ट्रांचा सिद्धांत नाकारला आहे. पण आजही भारतीय मुस्लिमांना बाहेरचं समजलं जाते, असे ओवेसी यांनी म्हटले.