33 मुस्लिम देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे मुस्लिम भारतात; डोवालांचे सौदीच्या नेत्यासमोर प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 06:11 PM2023-07-11T18:11:18+5:302023-07-11T18:11:52+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, उद्योगपती जॉर्ज सोरोस ते आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
देशात मुस्लिमांच्या सुरक्षेवरून आवाज उठविण्यात येत आहे. या दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतात कोणासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाहीय. जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतातील मुस्लिमांची संख्या ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आकडा इस्लामिक को ऑपरेशनच्या ३३ देशांच्या एकूण लोकसंख्येएवढा असल्याचे डोवाल यांनी सांगितले.
सौदी अरबचे माजी न्याय मंत्री अल-ईसा यांच्या समोर डोवाल यांनी हे वक्तव्य केले आहे. अल-ईसा यांना जगभरातील नरमपंथी इस्लामचा आवाज मानले जाते. ते पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, उद्योगपती जॉर्ज सोरोस ते आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. डोवाल यांनी हे फेटाळून लावताना अफवा असल्याचेही म्हटले आहे. भारतात कोणत्याही जाती-धर्म आणि वर्णभेदाशिवाय संपूर्ण स्वातंत्र्याने जगता येते, असे ते म्हणाले.
इस्लाम भारतात 7 व्या शतकात आला. मुस्लिम सखोल समज असलेल्या हिंदूंमध्ये मिसळले. त्यातून एक नवीन समाज निर्माण झाला आणि विकसित झाला. हे लोक एकत्र कसे आले, हे समजून घेण्यात इतिहासकार चुकले आहेत. त्यांचे लक्ष केवळ राजकीय घडामोडीपुरतेच मर्यादित राहिले आहे, असे प्रत्युत्तर डोवाल यांनी दिले.