ज्वारी, मका खरेदी केंद्राची घोषणा हवेतच

By admin | Published: November 2, 2016 12:43 AM2016-11-02T00:43:48+5:302016-11-02T00:43:48+5:30

जळगाव : शेतकर्‍यांना आधार मिळावा, बाजारपेठेतील स्पर्धेत शेतकर्‍यांची पिळवणूक थांबावी यासाठी १ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजपासून शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा दौर्‍यावर आले असता केली होती. पण हे केंद्र भाऊबीजेला म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी सुरू झालेच नाही.

Must announce announcement of jowar, maize procurement center | ज्वारी, मका खरेदी केंद्राची घोषणा हवेतच

ज्वारी, मका खरेदी केंद्राची घोषणा हवेतच

Next
गाव : शेतकर्‍यांना आधार मिळावा, बाजारपेठेतील स्पर्धेत शेतकर्‍यांची पिळवणूक थांबावी यासाठी १ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजपासून शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा दौर्‍यावर आले असता केली होती. पण हे केंद्र भाऊबीजेला म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी सुरू झालेच नाही.
सध्या ज्वारी व मका या पिकांची काढणी अपवाद वगळता सुरू झालेली नाही. आवक नसल्याने शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र आणखी उशीराने म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचे संकेत जिल्हा मार्केटींग फेडरेशनने दिले आहेत.
कृषिराज्यमंत्री खोत २१ ऑक्टोबर रोजी चिंचोली येथे शेतकरी मेळाव्यानिमित्त आले होते. तसेच चाळीसगाव तालुक्यातही त्यांनी अधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन शेतात जाऊन पाहणी केली होती. चिंचोली येथे मेळाव्यात सायंकाळी आपल्या भाषणात खोत यांनी १ नोव्हेंबरपासून शासकीय दरात ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे सुतोवाच केले होते. परंतु हे केंद्र सुरू न झाल्याने घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे.
यातच दिवाळी, पाडवा व भाऊबीज अशा सलग सु˜्या आल्याने मार्केटींग फेडरेशनतर्फे कुठलेही कामकाज झाले नाही. मार्केटींग फेडरेशनच्या बाजार समितीमधील शासकीय उडीद व मूग खरेदी केंद्रातही खरेदी विक्री झाली नाही.

बाजार समितीतही शुकशुकाट
सलगच्या सु˜्यांमुळे बाजार समितीमध्येही कामकाज बंद होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद यांची कुठलीही आवक झाली नाही. फक्त भाजीपाला मार्केट सुरू होते. बुधवारपासून (२ नोव्हेंबर) बाजार समितीचे कामकाज सुरू होणार आहे.

आज केळीबाबत बाजार समितीत बैठक
केळीची प्रचलित दरापेक्षा कमी दरात खरेदी केली जात असल्याचा मुद्द्यावर शेतकर्‍यांसोबत चर्चेसाठी २ रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीमध्ये बैठक होणार आहे. सभापती, उपसभापती व सहकार राज्यमंत्री हे या बैठकीत उपस्थित राहतील. बाजार समितीच्या आवारातील मुख्य सभागृहामध्ये ही बैठक होणार असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Must announce announcement of jowar, maize procurement center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.