मस्ट : एमपीटी पोर्टचा विस्तार लोकांसाठी धोकादायक
By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:43+5:302015-09-03T23:05:43+5:30
जुझे फि लिप डिसोझा : तीव्र आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इशारा
ज झे फि लिप डिसोझा : तीव्र आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इशारावास्को : वास्को-खारीवाडा येथे ड्रॅजिंग करून एमपीटीने पोर्टचे विस्तारीकरण करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रयत्न चालू केला आहे, तो मागे घ्यावा. अन्यथा, जनआंदोलनास तयार राहा, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जुझे फि लिप डिसोझा यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला़ फि लिप डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीटीने खारीवाडा येथे विस्तारीकरणाच्या नावाखाली पीपीपीद्वारे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) ड्रॅजिंग चालू करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो खारीवाडा तसेच इतर वास्को शहरापासून इतर भागातील लोकांना घातक आहे. त्यामुळे खारीवाडा येथील घरे या ड्रॅजिंगमुळे वाहून जाऊन लोक बेघर होणार तसेच येथील मच्छीमारांवर उघड्यावर पडण्याची वेळ येणार; कारण सध्या खारीवाडा येथे समुद्री खोलाई 14 मीटर असून एमपीटीकडून ही खोलाई 5 ते 6 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न होत आह़े जर ही खोलाई वाढविली तर यापासून खारीवाडा येथील घरांना तसेच हार्बर, सडा, वास्को शहर भागाला ही धोक्याची घंटा असेल. डिसोझा म्हणाले, एमपीटीचा हा प्रयत्न हाणून पाडण्यास आपण मागे-पुढे पाहणार नाही. संपूर्ण परिसर वाहून जाण्याची भीती आहे. याविषयी जनजागृती करून याविरुध्द आवाज उठविणार आहे. बायणा ते दोनापावला फे री सेवा चालू करण्याचा जो प्रयत्न एमपीटीने केला तो लोकांच्या हिताचा नाही. जर ही फे री सेवा सुरू झाली तर बायणा समुद्रकिनार्याचे सौंदर्य नष्ट होईल. तसेच पूर्वी हार्बर ते दोनापावला ही फे री सेवा 20 ते 25 मिनिटांची होती़ ती आता दोन ते अडीच तासांची होणाऱ तसेच यात इंधन खर्चही वाढणाऱ तसेच या लांब पल्ल्याच्या प्रवासात समुद्रात एखादी वादळी वार्याची वैगेरे घटना घडली तर ते प्रवाशांना धोकादायक ठरेल.तसेच हा संपूर्ण बायणा समुद्री प?ा एमपीटीच्या घशात जाणार असून लोक येथील समुद्री सौंदर्यापासून वंचित राहणार आहेत, असे डिसोझा म्हणाले. पत्रकार परिषदेत नगरसेविका नॅनी डिसोझा, प्रशांत लोटलीकर, अँड़ अशोक नाईक, नगरसेवक पाश्कोल डिसोझा आदी उपस्थित होत़े (वार्ताहर) स्थानिक आमदार, मंत्रीकरतात खिसे भरण्याचे कामयाविषयी स्थानिक आमदार तसेच मंत्री काहीच करत नाहीत. त्यांनी या एमपीटीच्या कामाला चालना देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केल्याचा घणाघाती आरोप जुझे फि लिप डिसोझा यांनी या वेळी केला़ स्थानिक आमदार, मंत्री तसेच नगरसेवक जे बोर्ड ऑफ ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत, तेही काहीही करत नसल्याचे ते म्हणाले. अदानीसारख्या कंपनीकडून या सर्वांचे खिसे भरत असल्याचे त्यांनी सांगितल़े स्थानिक आमदार व मंत्री यांना लोकांच्या हिताचे काहीएक पडले नाही. ते एमपीटी तसेच अदानी कंपनीचे कटपुतळी बाहुले झाल्याचे डिसोझा यांनी सांगितल़े फ ोटो आहे : 0309 वीएएस 09ओळी :पत्रकार परिषदेत दरम्यान माहिती देताना जुझे फि लिप डिसोझा. बाजूला नॅनी डिसोझा, प्रशांत लोटलीकर व इतऱ छाया : शेखर कळंगुटकर