मिशा असाव्यात तर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या! तरुणाईत नवी क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 05:09 PM2019-03-03T17:09:04+5:302019-03-03T17:11:41+5:30
अभिनंदन आणि त्यांच्या मिशांची सर्वत्र चर्चा
बंगळुरू: पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरुप परतलेल्या, मिग-21 विमानातून अत्याधुनिक एफ-16 विमानाला जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. अभिनंदन यांच्या मिशांचीदेखील अनेकांमध्ये चर्चा आहे. सोशल मीडियामध्ये अभिनंदन यांच्या मिशा ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळेच अनेक जण त्यांच्यासारख्या मिशा ठेवू लागले आहेत.
मुछे हो तो नथ्थूलाल जैसी, वरना ना हो, हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. मात्र आता नथ्थूलाल यांच्या जागी अभिनंदन यांचं नाव घेतलं जात आहे. अभिनंदन यांच्या सारख्या मिशा हव्यात, अशी मागणी अनेकजण सलूनमध्ये करू लागले आहेत. 'अभिनंदन यांची जबरदस्त कामगिरी ऐकून मी त्यांचा फॅन झालो. ते खरे हिरो आहेत. मला त्यांची स्टाईल फार आवडली. त्यामुळेच मी त्यांच्यासारखी मिशी ठेवली,' असं बंगळुरुत राहणाऱ्या मोहम्मद चंद यांनी सांगितलं.
Wing Commander #AbhinandanVarthaman's moustache style getting popular. A Bengaluru local Mohammed Chand says,' I'm his fan, we follow him. I like his style. He is the real hero; I'm happy.' pic.twitter.com/cT7QGXntMs
— ANI (@ANI) March 3, 2019
विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी (1 मार्चला) भारतात परतले. अभिनंदन यांचं मिग 21 विमान कोसळल्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रं नष्ट केली. पाकिस्तानी सैन्यानं अभिनंदन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगितली नाही. एफ-16 विमान पाडणाऱ्या आणि जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असताना कोणतीही गोपनीय माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांच्या कामगिरीची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे.