बलात्कारप्रकरणी बंगळुरात मूक मोर्चा
By admin | Published: July 20, 2014 01:59 AM2014-07-20T01:59:11+5:302014-07-20T01:59:11+5:30
घटनेच्या निषेधार्थ शनिवारी शेकडो लोकांनी मूक मोर्चा काढून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची व दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
Next
बंगळुरू : बंगळुरू येथील एका शाळेत सहा वर्षाच्या बालिकेवर बलात्काराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी शेकडो लोकांनी मूक मोर्चा काढून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची व दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
विबग्योर हायस्कूलमध्ये 2 जुलै रोजी एका सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात लोकांनी बलात्कार केला होता; परंतु 15 जुलै रोजी हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून पोलिसांनी कुणालाही अटक न केल्याने लोक प्रक्षुब्ध झाले. शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यात शाळेतील विद्याथ्र्याचे पालकही सहभागी झाले होते. विबग्योर हायस्कूलपासून काढण्यात आलेला हा मूक मोर्चा एचएएल पोलीस ठाण्यावर धडकला. पोलीस आयुक्तांनी हजर व्हावे, अशी मागणी निदर्शकांनी केल्यामुळे पोलीस आयुक्त राघवेंद्र अरुदकर तेथे आले. ‘या घटनेमुळे आम्ही अतिशय दु:खी आहोत. दोषींवर कारवाई होईल. पोलिसांवर विश्वास ठेवा,’ असे अरुदकर यावेळी निदर्शकांना उद्देशून म्हणाले. या बलात्कारप्रकरणी अद्याप कुणालाही अटक का करण्यात आली नाही, असा सवाल करून निदर्शकांनी तपासावर संशय व्यक्त केला. (वृत्तसंस्था)