इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुथ्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 08:44 AM2021-03-07T08:44:21+5:302021-03-07T08:45:56+5:30

Muthoot group chairman MG George falls to death from 4th floor of Delhi residence : एमजी जॉर्ज मुथ्थूट हे दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलासमध्ये राहत होते.

Muthoot group chairman MG George falls to death from 4th floor of Delhi residence | इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुथ्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज यांचा मृत्यू 

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुथ्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज यांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देमुत्थूट कंपनी भारतातील सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपनी आहे. गेल्या वर्षी फोर्ब्स मॅगजिनमध्ये श्रीमंतांच्या यादीत ज्या सहा मल्याळी लोकांचा समावेश होता, त्यामध्ये एमजी जॉर्ज मुत्थूट यांचेही नाव होते.

नवी दिल्ली :  मुत्थूट ग्रुपचे (Muthoot group) चेअरमन एमजी जॉर्ज मुथ्थूट (MG George Muthoot) यांचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. एमजी जॉर्ज मुथ्थूट हे दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलासमध्ये राहत होते. (Muthoot group chairman MG George falls to death from 4th floor of Delhi residence)

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजता एमजी जॉर्ज मुथ्थूट हे दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलासमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. ७१ वर्षीय एमजी जॉर्ज मुथ्थूट हे आजारी सुद्धा होते. इमारतीवरून पडल्यानंतर त्यांच्या लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

मुथ्थूट फायनान्स देशातील सर्वात मोठी गोल्ड लोन नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBCFC) आहे. म्हणजेच, मुथ्थूट कंपनी भारतातील सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपनी आहे. 

एमजी जॉर्ज मुथ्थूट आपल्या कुटुंबीयातील तिसऱ्या पिढीतील सदस्य होते. त्यांनी मुथ्थूट ग्रुपचे चेअरमन पद सांभाळले होते. त्याचबरोबर, ते Ortodox Church चे ट्रस्टी सुद्धा होते. तसेच, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (FICCI) राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही होते. याशिवाय, एमजी जॉर्ज मुथ्थूट हे फिक्की केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.

गेल्या वर्षी फोर्ब्स मॅगजिनमध्ये श्रीमंतांच्या यादीत ज्या सहा मल्याळी लोकांचा समावेश होता, त्यामध्ये एमजी जॉर्ज मुथ्थूट यांचेही नाव होते. एमजी जॉर्ज मुथ्थूट यांच्या नेतृत्वात मुथ्थूट ग्रुपने जगभरात पाच हजारहून अधिक शाखा आणि २० हून अधिक वेगवेगळ्या व्यवसायात विस्तार केला आहे.

Web Title: Muthoot group chairman MG George falls to death from 4th floor of Delhi residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.