CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 08:13 AM2020-05-14T08:13:18+5:302020-05-14T08:23:19+5:30

गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेत 6 कामगार ठार झाले, तर दोन गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

muzaffarnagar 6 migrants workers died and 2 injured bus ramps vrd | CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक मजूर आणि कामगार आपापल्या गावी परतले आहेत. काही कामगार एक्सप्रेस वे मार्गे आपापल्या घरी परतत आहेत.

मुजफ्फरनगरः लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक मजूर आणि कामगार आपापल्या गावी परतले आहेत. काही कामगार एक्सप्रेस वे मार्गे आपापल्या घरी परतत आहेत. उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये रोडवेज बसने आपापल्या घरी परतणा-या कामगारांना चिरडले. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेत 6 कामगार ठार झाले, तर दोन गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सर्व मजूर पंजाबमध्ये कामाला होते आणि बिहारला जात होते. गुरुवारी मुजफ्फरनगर कोतवालीच्या सहारनपूर रोडवर मजूर पोहोचले, तेव्हा रोडवेज बसने त्यांना चिरडले. या घटनेत 6 कामगार जागीच ठार झाले, तर दोन जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. याव्यतिरिक्त जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार हे बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असून ते पंजाबहून पायी परतत होते.

यापूर्वी यूपीच्या जालौन पोलिसांचा निष्काळजीपणाचा चेहरा समोर आला होता. एका प्रवासी मजूरचा मृतदेह तासनतास रस्त्यावर पडला होता, परंतु माहिती मिळाल्यानंतरही पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. हे प्रकरण जालौन पोलिस स्टेशन परिसरातील एनएच -27वर असलेल्या एनटीपीसी प्लांटशी संबंधित होते. येथे वेगात डंपरने एका कामगारांना धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी मृत्यूची माहिती पोलीस ठाण्यात दिली, पण जवळपास 5 तासांनंतर पोलीस स्टेशनला घटनास्थळी जाणे योग्य वाटले नाही आणि पाच तास मजूरचा मृतदेह रस्त्यावर पडून होता. जेव्हा याची माध्यमांनी दखल घेतली, तेव्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Web Title: muzaffarnagar 6 migrants workers died and 2 injured bus ramps vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.