मुझफ्फरनगर कवाल हत्याकांड प्रकरणात सातही आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:04 PM2019-02-08T17:04:59+5:302019-02-08T17:05:36+5:30

दंगलीमध्ये 60 जणांचा मृत्यू झाला होता.

Muzaffarnagar Kawal murder case, life imprisonment has been given to seven other accused | मुझफ्फरनगर कवाल हत्याकांड प्रकरणात सातही आरोपींना जन्मठेप

मुझफ्फरनगर कवाल हत्याकांड प्रकरणात सातही आरोपींना जन्मठेप

Next

मुझफ्फरनगर : अखिलेश सरकारच्या काळात मुझफ्फरनगरमध्ये दोन भावांच्या हत्याप्रकरणात सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. सचिन आणि गौरव यांची हत्या झाल्यानंतर कवाल गावामध्ये दंगल उसळली होती.

 
या प्रकरणी मुजम्मिल, मुजस्सिम, फुरकान, नदीम, जहांगीर, अफजल आणि इक्बाल या सातजणांना दोषी ठरविण्यात आले. आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 27 ऑगस्ट 2013 मध्ये हे प्रकरण घडले होते. यावेळी झालेल्या दंगलीमध्ये मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये 60 जण ठार झाले होते. 


सरकारी वकील कुमार त्यागी यांनी सांगितले की, 2013 मध्ये सचिन आणि गौरव यांच्याशी आरोपींचा मोटारसायकल अपघातावरून वाद झाला होता. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी भडकलेल्या दंग्यामध्ये आरोपींपैकी शाहनवाज याचाही मृत्यू झाला होता. 

Web Title: Muzaffarnagar Kawal murder case, life imprisonment has been given to seven other accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.