मुजफ्फरनगर दंगल, चौघांवरील अटक वॉरंट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:57 AM2017-12-26T03:57:43+5:302017-12-26T03:57:50+5:30
मुजफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात स्थानिक न्यायालयाने उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा, भाजपाचे आमदार संगीत सोम आणि भाजपाचे खासदार भारतेंदू सिंह व आणखी एक व्यक्ती चंद्र पाल यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले.
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात स्थानिक न्यायालयाने उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा, भाजपाचे आमदार संगीत सोम आणि भाजपाचे खासदार भारतेंदू सिंह व आणखी एक व्यक्ती चंद्र पाल यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले.
हे वॉरंट राज्य सरकारने वरील तिघांवर खटला चालवायला परवानगी दिल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मधू गुप्ता यांनी रविवारी हे वॉरंट रद्द केले. भारतीय दंड संहितेचे कलम १५३ ए (दोन वेगवेगळ््या गटांत वैमनस्य पसरविणे) अंतर्गत या चौघांना आधीच जामीन दिला गेलेला आहे, असा युक्तिवाद या चौघांच्या वकिलाने केला होता. (वृत्तसंस्था)