नवऱ्याने दिलेल्या मोबाईलवरुन बॉयफ्रेंडला करायची Video कॉल, व्हॅलेटाईन वीकमध्ये झाली पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:58 IST2025-02-15T12:58:24+5:302025-02-15T12:58:42+5:30

लग्नाच्या दहा महिन्यांनंतर व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.

muzaffarpur bride ran away with her lover in valentine week taking jewelry and money | नवऱ्याने दिलेल्या मोबाईलवरुन बॉयफ्रेंडला करायची Video कॉल, व्हॅलेटाईन वीकमध्ये झाली पसार

नवऱ्याने दिलेल्या मोबाईलवरुन बॉयफ्रेंडला करायची Video कॉल, व्हॅलेटाईन वीकमध्ये झाली पसार

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दहा महिन्यांनंतर व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. यासोबतच तिने दागिने आणि रोख रक्कमही पळवून नेली. महिलेचा पती दुसऱ्या शहरात काम करतो. ती महिला तिच्या प्रियकराशी व्हिडीओ कॉलवर सतत संपर्कात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण साहेबगंज पोलीस स्टेशन परिसरातील रामपूर असली गावातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणाचं लग्न २४ एप्रिल २०२४ रोजी झालं. लग्नानंतर काही महिन्यांतच पत्नीच्या सांगण्यावरून तो तरुण पैसे कमवण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला. याच दरम्यान त्याच्या पत्नीने एक अँड्रॉइड मोबाईल खरेदी केला. मोबाईल खरेदी केल्यानंतर, महिलेने तिच्या पतीपेक्षा तिच्या प्रियकरासोबत जास्त बोलायला सुरुवात केली.

१० फेब्रुवारीच्या रात्री महिलेने प्रथम तिच्या सासू आणि सासऱ्यांना जेवण दिलं आणि त्यांना झोपवलं. यानंतर तिने घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम गोळा केली आणि तिच्या प्रियकरासोबत बाईकवरून पळून गेली. रात्री सासू आणि सासऱ्यांना बाईकचा आवाज ऐकू आला, पण त्यांना काहीच समजलं नाही. सकाळी सून घरात सापडली नाही तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला फोन करून माहिती दिली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

महिलेच्या सासऱ्यांनी साहिबगंज पोलीस ठाण्यात अर्ज सादर करून आपल्या सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तो त्याच्या सुनेला या आशेने घरी घेऊन आला होता की ती कुटुंबाची सेवा करेल, परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतरच तिने तिच्या प्रियकरासोबत जाऊन कुटुंबाला धक्का दिला आहे. 

महिलेच्या पतीने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध सुरू होते. जेव्हा मला हे कळलं तेव्हा माझं माझ्या पत्नीशी भांडण झालं. मी माझ्या पगारातून तिला फोन विकत घेतला. मी बंगळुरूमध्ये राहतो आणि मजूर म्हणून काम करतो. पगार तिच्या खात्यात पाठवत असे, पण १० फेब्रुवारी रोजी ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिने माझा विश्वास तोडला आणि ती निघून गेली. आता जर ती परत आली तर मी तिला माझ्यासोबत ठेवणार नाही. मी खूप मेहनत करून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ती पळून गेली.  खात्यात ३२ हजार रुपये जमा होते आणि तिने सोने-चांदीचे दागिनेही नेले आहेत.
 

Web Title: muzaffarpur bride ran away with her lover in valentine week taking jewelry and money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार