देशात '60,000 किमीचा 'वर्ल्ड क्लास हायवे' बनविण्याचं माझं लक्ष्य, 2024 पर्यंत पूर्ण करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 08:53 AM2021-07-10T08:53:38+5:302021-07-10T08:56:14+5:30
नितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे.
नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रस्ते विकास प्राधिकरणाच्या 16 व्या वार्षिक समारंभात सहभाग नोंदवला. यावेळी, बोलताना देशात 60 हजार किमी लांबीचा वर्ल्डक्लास नॅशनल हायवे बनविण्याचे माझे स्वप्न आहे. मला 2024 पर्यंत ते पूर्णही करायचे आहे. त्यासाठी, दिवसाला 40 किमीचा रोड बनिवण्यात येईल, असे गडकरींनी सांगितले.
नितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी देशातील विविध भागांत रस्ते रुंदीकरण आणि नव्याने रस्ते बांधणी कामासाठी लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अनेकठिकाणी या कामाच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत.
My aim is to construct 60,000 km of world-class national highway by 2024, at the rate of 40 km per day: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/WQp8vnal8R
— ANI (@ANI) July 9, 2021
भारतात जवळपास 63 लाख किमीचे रस्ते दळणवळ आहे, जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा रस्ते महामार्ग आपल्या देशात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रस्ते दळणवळण हा अतिशय महत्त्वाचा भाग असून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या नेटवर्कमुळे शक्य होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारकडून 1.4 ट्रिलीयन डॉलर (111 लाख कोटी रुपये) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या क्षेत्रासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास 34 टक्क्यांनी वाढ करण्यात येते. यंदाही 5.34 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी वाढवून देण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.