यशस्वी झाल्याचा दावा केल्यास ते माझं अपयश - नरेंद्र मोदी
By admin | Published: July 5, 2016 09:24 AM2016-07-05T09:24:32+5:302016-07-05T09:24:32+5:30
जर काही कामगिरी केल्याचा दावा मी करु शकत असेन तर त्याला मी माझं यश मानणार नाही', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 05 - 'लोकांना बदल झाल्याची जाणीव होणे हाच माझ्यासाठी यशाचा अर्थ आहे. जर काही कामगिरी केल्याचा दावा मी करु शकत असेन तर त्याला मी माझं यश मानणार नाही', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी नरेंद्र मोदींनी सोमवारी काही संपादकांची भेट घेतली. दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर अनेक मुद्यांवर त्यांनी चर्चादेखील केली.
'नवीन मंत्र्यांच्या शपथविधीवर बोलताना मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे, फेरबदल नाही', असंही नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं आहे. सरकार चालवण्याबद्दल बोलताना 'आम्ही स्पीड आणि फोकस या गोष्टी स्पष्ट करत आहोत. शौचालय बांधण्यातही विमानतळ बांधताना जो स्पीड आणि फोकस दाखवला जातो तोच दाखवू', असं मोदी बोलले आहेत.
जीएसटीला विरोध म्हणजे आत्महत्या -
आर्थिकदृष्या सुधारणा करताना होत असलेल्या राजकीय विरोधावर बोलताना 'आम्ही आशावादी आहोत, हेडलाईन्सपेक्षा लाईफलाइन्सवर आमचा जास्त विश्वास असल्याचं', मोदी बोलले आहेत. 'जीएसटीला विरोध करणे म्हणजे कोणत्याही विरोधी पक्षाला आत्महत्या करण्यासारखं असल्याचं', मोदींनी सांगितलं आहे.
'2019 ला माझा कार्यकाळ पुर्ण होईपर्यंत जर काही कामगिरी केल्याचा दावा करण्याच्या लायक मी असेन तर मी त्याला माझं यश मानत नाही. मी कोणताही दावा न करता लोकांनी बदल झालेला जाणवत असेल तर मी त्याला माझं यश मानतो. हीच योग्य पद्दत असल्याचं', मोदी बोलले आहेत.