'माझे वडील मुस्लिम होते, पण आईची गॅरेंटी नाही देऊ शकत', मुनव्वर राणांचे अजब वक्तव्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:25 PM2022-10-19T18:25:55+5:302022-10-19T18:26:06+5:30
मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त किंवा विचित्र विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारची अनेकदा वक्तव्ये केली आहेत.
Munawwar Rana comment on Mother: आयुष्यभर आईवर कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांनी अजब विधान केले आहे. पसमंडा मुस्लिमांना जोडण्यासाठी भाजपने यूपीमध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनाबाबत त्यांनी एक विधान केले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईचाही उल्लेख केला.
'वडील मुस्लिम होते, पण आई...'
एका खासगी वाहिनीशी बोलताना मुनव्वर राणा यांना भाजपच्या पसमंडा अधिवेशनाबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'पसमंडा म्हणजे समाजातील मागासलेले लोक. इस्लाममध्ये पसमंडाचा काही अर्थ नव्हता. अरबस्तानातही ही जात कोणाला माहीत नव्हती, पण भारतात आल्यावर त्यांना समजली.
यादरम्यान त्यांनी एक अजब उदाहरण दिले. ते म्हणाले, "मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की, माझे वडील मुस्लिम होते, मी याची हमी देतो. पण माझी आई मुस्लिम होती, याची खात्री देता येणार नाही. कारण भारतात आलेले माझे पहिले वडील, मग ते समरकंद, आफ्रिका, अरबस्तान किंवा कोठूनही आले, ते सैन्यासोबत आले आणि सैन्य त्यांच्या सोबत बायकांना घेऊन जात नसे. अशा परिस्थितीत आईही मुस्लिम होती, याची खात्री देता येत नाही."
यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली
मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त आणि विचित्र विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ज्ञानवापी प्रकरणात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे न्यायाधीशांसाठी अपशब्द वापरले होते. "न्यायाधीश जे बोलायचे ते बोलले. मी राजा, पंतप्रधान असतो तर त्या न्यायाधिशांना अटक केली असती,'' असे राणा म्हणाले होते.