“माझं घर सर्वांसाठी खुलं, कोणीही विडिओग्राफी करू शकतं,” LG व्हीके सक्सेनांचा आपवर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:10 PM2023-04-30T21:10:55+5:302023-04-30T21:11:29+5:30

नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्य सचिवांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

My house is open to all anyone can do videography LG VK Saxena on aap arvind kejriwal house renovation | “माझं घर सर्वांसाठी खुलं, कोणीही विडिओग्राफी करू शकतं,” LG व्हीके सक्सेनांचा आपवर पलटवार 

“माझं घर सर्वांसाठी खुलं, कोणीही विडिओग्राफी करू शकतं,” LG व्हीके सक्सेनांचा आपवर पलटवार 

googlenewsNext

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं प्रकरण सातत्यानं जोर धरत आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्य सचिवांकडून या प्रकरणाची फाईल मागितली आहे. किंबहुना, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या देखभालीवर ४५ कोटी खर्च केल्याचा आरोप करत भाजप सातत्यानं अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. दरम्यान, नायब राज्यपाल सक्सेना यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांकडे संबंधित फाइल मागितल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. नायब राज्यपालांच्या घरावरही कोट्यवधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आल्याचा आरोपही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, यावर उत्तर देताना नायब राज्यपालांनी आपलं घर माध्यमांसाठी खुलं असल्याचं म्हटंल. “तुम्ही हवं तेव्हा येऊन पाहू शकता, कितीचं रिनोवेशन करण्यात आलंय. माझं घर सामान्य लोकांसाठी खुलं आहे. व्हिडीओग्राफीही करू शकता. आम आदमी पक्ष जो दावा करतो, माझ्या घरात १५ कोटींचं रेनोवेशन झालंय. तसं नाही. मी अहवाल मागवलाय (मुख्यमंत्री निवासस्थान) मला जी कारवाई करायची होती मी केली. आता मुख्य सचिव अहवाल सोपवतील,” असं ते म्हणाले.

भाजपकडून हल्लाबोल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८ लाख रुपयांचे पडदे लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर, मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. सदर मार्बल व्हिएतनामवरून आणल्याचा दावा केला जात आहे. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. यावरून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 

Web Title: My house is open to all anyone can do videography LG VK Saxena on aap arvind kejriwal house renovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.