जितनी बडी मेरी मुंछ है उससे बडी मेरी सोच हैं
By admin | Published: February 17, 2017 12:52 AM2017-02-17T00:52:51+5:302017-02-17T00:52:51+5:30
आपल्या प्रचंड लांब मिशांसाठी परिचित असलेले इंद्रप्रकाश पांडेय उर्फ राका पांडेय हे पिंडारा विधानसभा मतदार (वाराणसी) संघातून
वाराणसी : आपल्या प्रचंड लांब मिशांसाठी परिचित असलेले इंद्रप्रकाश पांडेय उर्फ राका पांडेय हे पिंडारा विधानसभा मतदार (वाराणसी) संघातून निवडणूक लढवणार असून त्यांचा पक्ष आहे भारतीय महासन्मान पक्ष (बीएमपी) व ते त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
बीएमपीची स्थापना ११ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील लोकांच्या सेवेसाठी झाल्याचा त्यांचा दावा आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयातून त्यांनी त्यांचा अर्ज घेतला. पांडेय यांनी अनेक गंमतीदार घोषणा शोधून काढल्या आहेत. ‘जो चुनाव में पाच करोड का करेला खर्चा, बाद में पाँच साल जनता की आँखों मे झोकेंगा मिर्चा.’ पांडेय म्हणतात की माझ्या मिशा याच माझी ओळख आहे. ते दरमहिन्याला १,१०० रुपये आपल्या मिशा जपण्यासाठी खर्च करतात. त्यांच्या इतर घोषणाही गंमतीशीर आहेत. ‘चुनाव में खाले मिठाई, बाद में पांच साल हो ले पिटाई.’ मतदार संघाबाहेरील व महाग गाड्यांमध्ये फिरणाऱ्या लोकांच्या आश्वासनांच्या लाटेत वाहात जाऊ नका, असा इशारा राका पांडेय देतात. मी प्रत्येकाला व्यक्तिश: ओळखतो. माझे पाय जमिनीवर आहेत हे सांगायला ते विसरत नाहीत.
पांडेय म्हणतात,‘जितनी बडी मेरी मुंछ है उससे बडी मेरी सोच हैं’. राका पांडेय यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायचे आहे व मी मुख्यमंत्री बनल्यावरच राज्याचा विकास होईल, असा त्यांचा दावा आहे. बीएमपीकडून किती उमेदवार निवडणूक लढवत आहेत हे त्यांनी सांगितलेले नाही. ते स्वत:च्या प्रचारासाठी दुचाकी वापरतात.