माझा मुलगा राहुल गांधींमुळेच पायलट झाला : निर्भयाची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 04:03 PM2017-11-02T16:03:59+5:302017-11-02T16:07:22+5:30

राजधानी दिल्लीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्या वाईट वेळेत कुटुंबियांची साथ दिल्याबद्दल निर्भयाच्या आईने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. 

My son become pilot due to support of Rahul Gandhi says Nirbhay's Mother | माझा मुलगा राहुल गांधींमुळेच पायलट झाला : निर्भयाची आई

माझा मुलगा राहुल गांधींमुळेच पायलट झाला : निर्भयाची आई

Next

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्या वाईट वेळेत कुटुंबियांची साथ दिल्याबद्दल निर्भयाच्या आईने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. 

निर्भयाचा भाऊ आता पायलट बनला आहे. यासाठी निर्भयाची आई आशा देवी यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले. कधी हार मानू नकोस असा सल्ला राहुल यांनी दिला होता. निर्भयासोबत ही भीषण घटना घडली, त्यावेळी तिचा भाऊ बारावीत शिकत होता. त्याला सैन्यात सामील व्हायचं असल्याचं समजल्यानंतर, राहुल गांधींनी त्याला बारावीचं शिक्षण झाल्यावर पायलटचं प्रशक्षिण घेण्याचा सल्ला दिला असं आशा देवी म्हणाल्या.  त्या घटनेनंतर माझ्या मुलाला मोठा मानसिक धक्का बसला होता. पण राहुल गांधींनी केवळ त्याच्या शिक्षणासाठीच मदत केली नाही तर त्याला सातत्याने फोन करुन पायलट ट्रेनिंग कोर्स करण्यासाठी प्रोत्साहनही दिलं असं त्या म्हणाल्या. 

2013 मध्ये सीबीएसईची परीक्षा दिल्यानंतर त्याने रायबरेलीची इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीत प्रवेश घेतला. यानंतर तो रायबरेलीला शिफ्ट झाला, तिथे त्याला फार अडचणी आल्या. तरीही तो मागे हटला नाही. 18 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान तो सातत्याने निर्भया प्रकरणाचे अपडेट्स घेत होता. याचदरम्यान राहुल गांधी त्याच्याशी फोनवरुन संपर्कात होते. कधीही माघार घेऊ नको, असं राहुल गांधी त्याला सांगत होते.

निर्भयाच्या आईने सांगितलं की, त्याचं शिक्षण आता पूर्ण झालं आहे. तो सध्या गुरुग्राममध्ये प्रशिक्षण घेत आहे. लवकरच तो विमान उडवेल. राहुल यांच्याशिवाय त्यांची बहिण प्रियांका गांधी-वाड्रा यांनीही अनेकदा फोन करून कुटुंबियांची विचारणा केली होती असं त्या पुढे म्हणाल्या.

16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. निर्भया प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

Web Title: My son become pilot due to support of Rahul Gandhi says Nirbhay's Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.