म्यानमार सरकारची बंडखोरांंशी शस्त्रसंधी
By Admin | Published: October 15, 2015 11:23 PM2015-10-15T23:23:16+5:302015-10-15T23:23:16+5:30
म्यानमार सरकारने १५ पैकी ८ वांशिक सशस्त्र गटांशी गुरुवारी राष्ट्रव्यापी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे जवळपास ६० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट होण्याची चिन्हे आहेत.
ने पेए ताव : म्यानमार सरकारने १५ पैकी ८ वांशिक सशस्त्र गटांशी गुरुवारी राष्ट्रव्यापी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे जवळपास ६० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट होण्याची चिन्हे आहेत.
या करारावर म्यानमार इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षक उपस्थित होते. सरकारच्या वतीने अध्यक्ष ऊ थिन सिन, उपाध्यक्ष साई मौक खाम आणि ऊ न्यॅन टून यांनी प्रतिनिधित्व केले.
ज्या आठ गटांशी करार झाला त्यात कईन नॅशनल युनियन, कईन नॅशनल लिबरेशन आर्मी-पीस कॉन्सिल, आॅल बर्मा स्टुडंटस् डेमोकॅ्रटिक फ्रंट आणि चीन नॅशनल फ्रंट आदींचा समावेश होता, असे वृत्त शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले. (वृत्तसंस्था)