"घरीच कोरोना टेस्ट करणाऱ्या CoviSelf किटचे उत्पादन वाढणार, दर आठवड्याला तयार होणार 10 कोटी युनिट्स"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:03 PM2021-05-24T14:03:13+5:302021-05-24T14:04:47+5:30
coviself test kit : घरात स्वत: ची टेस्ट करण्याच्या या किटला 'कोविसेल्फ' (CoviSelf) म्हणतात आणि संसर्गाची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या टेस्टचा निकाल 15 मिनिटांच्या आत दाखविला जाऊ शकतो.
मुंबई : पुढील काही महिन्यांत मागणीनुसार होम-बेस्ड कोरोना टेस्ट किटच्या आठवड्यातून दहा कोटी युनिट उत्पादन करण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे, असे भारतीय डायग्नोस्टिक्स कंपनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने (मायलॅब) शुक्रवारी म्हटले आहे. मायलॅबचे सीईओ राहुल पाटील म्हणाले की, 'कंपन्याद्वारे निर्मित टेस्ट किटमध्ये सरकारी संस्था आणि कंपन्यांनी रस दाखविला आहे. कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय कोणताही व्यक्ती कोरोनाची टेस्ट करु शकते आणि हे खेड्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.' (mylab can ramp up production of coviself test kit to 10 crore units per week)
तज्ज्ञांचा असा दावा आहे की, ग्रामीण भागातील टेस्टिंगच्या अभावामुळे देशात संसर्ग आणि मृत्यू हे अधिकृत अंदाजापेक्षा पाच ते दहा पट जास्त असू शकतात. राहुल पाटील म्हणाले की, कंपनी येत्या दोन आठवड्यांत साप्ताहिक उत्पादन 10 कोटीपर्यंत वाढवू शकते आणि मागणीनुसार पुढील चार ते सहा आठवड्यांत 10 कोटीपर्यंत पोहोचण्याची क्षमता विकसित करेल.
घरात स्वत: ची टेस्ट करण्याच्या या किटला 'कोविसेल्फ' (CoviSelf) म्हणतात आणि संसर्गाची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या टेस्टचा निकाल 15 मिनिटांच्या आत दाखविला जाऊ शकतो. टेस्ट क्षमता वाढविण्यासाठी या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. याची प्रति युनिट किंमत 250 रुपये आहे. याद्वारे हे देखील सुनिश्चित केले जाईल की ,रूग्ण शक्य तितक्या लवकर आयसोलेशनमध्ये राहू शकेल आणि अशा प्रकारे संक्रमणाचा प्रसार कमी होऊ शकेल.
एका दिवसांत 10 लाख युनिटचे उत्पादन
अलीकडेच या कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक श्रीकांत पटोले म्हणाले होते, 'आम्ही लोणावळा येथील आमच्या केंद्रात दिवसाला दहा लाख युनिट्स तयार करत आहोत. पुढील 10 दिवसात आमच्याकडे एक कोटी युनिट तयार होतील आणि त्यानंतर आम्ही 1 जूनला ते राष्ट्रीय स्तरावर जाहीर करू. याचबरोबर, कंपनीकडे उत्पादन करण्यासाठी पुरेसा कच्चा माल आहे आणि येत्या पंधरवड्यापर्यंत हे उत्पादन दररोज 15 लाख युनिटपर्यंत वाढविले जाईल.'