फक्त 51 रुपयात खरेदी करा भारी ब्रॅण्डेड कपडे, मिंत्राचा नवा मार्केटिंग मंत्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 10:25 AM2018-03-15T10:25:51+5:302018-03-15T10:25:51+5:30
या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे.
मुंबई- सध्या कुठलीही वस्तू खरेदी करणं अगदी सोपं झालं आहे. महाग वस्तू ईएमआयवर घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असतो. दुकानांबरोबरच सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरूनही वस्तू ईएमआयवर घेणं शक्य झालं आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल यांसारख्या वस्तून ईएमआयवर घेतो. पण आता कपडेही ग्राहकांना ईएमआयवर घेता येणार आहेत. मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे.
मिंत्रा या शॉपिंग ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून ग्राहकांना ईएमआयवर कपडे विकत घेता येतील. यासाठी दरमहिन्याला 51 रूपयांचा ईएमआय भरावा लागेल. 3 ते 24 महिने असा ईएमआयचा कालावधी असेल. ज्या प्रमाणे आपण एखादी महागडी वस्तू खरेदी केल्यावर योग्य महिन्याचा प्लॅन निवडून ईएमआय भरतो तोच नियम कपडे खरेदीच्या बाबतीतही लागू होतो आहे.
मिंत्राची ईएमआय पॉलिसी नेमकी कशी ?
क्रेडिट कार्ड वापरून महाग वस्तू खरेदी केल्यावर ज्याप्रकारे इन्स्टॉलमेंट विभागून मिळतात. तसंच या पॉलिसीमध्येही असेल. 1300 किंवा त्यापेक्षी कमी किंमतीची वस्तू मिंत्रावरून खरेदी केल्यानंतर ही ईएमआय पॉलिसी घेता येईल. त्यामुळे मिंत्रावरून कपडे, दागिने किंवा इतर वस्तू खरेदी करून तुम्हाला नंतर ईएमआय स्वरूपात पैसे भरता येतील. वेगळे व महागडे ब्रॅण्ड ज्यांना वापरायचे आहेत अशांचा याचा फायदा होणार आहे.
कसं काम करेल मिंत्रा ईएमआय ?
मिंत्राने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅमेक्स, एचएसबीसी यांसारख्या बँकाबरोबर मिंत्राची पार्टनरशीप आहे. याच बँका ईएमआय पॉलिसीमध्ये मदत करतील. या बँका खरेदीवर 13 ते 15 टक्के इंटरेस्ट आकारतील.