नवरा झाला हैवान! 12 वर्षे बायकोला घरात ठेवलं कोंडून; महिलेने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:39 PM2024-02-05T15:39:41+5:302024-02-05T15:44:52+5:30

एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तब्बल 12 वर्षे घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने पोलिसांना संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

mysuru husband kept wife locked inside house for 12 years and tortured- | नवरा झाला हैवान! 12 वर्षे बायकोला घरात ठेवलं कोंडून; महिलेने सांगितली आपबीती

फोटो - आजतक

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तब्बल 12 वर्षे घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने पोलिसांना संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे. मात्र, महिलेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार देत आई-वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कर्नाटकातील म्हैसूरचं आहे. एका महिलेची पोलिसांनी सुटका केली, जिला तिच्या पतीने 12 वर्षांपासून घरात कोंडून ठेवलं होतं. 30 वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितलं की, पतीने 12 वर्षांपासून घरात कोंडून ठेवलं होत. तिने टॉयलेटसाठी खोलीतील एक छोट्या बॉक्सचा वापर केला. महिलेला दोन मुलं आहेत. मुलं शाळेतून परतली की घराबाहेर थांबायची आणि नवरा कामावरून परतला की मुलं आत यायची.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. माझा नवरा मला नेहमी घरात कोंडून ठेवायचा आणि माझा छळ करायचा. याबाबत परिसरातील कोणीही त्याला कधीच विचारलं नाही. माझी मुलं शाळेत जातात, पण माझा नवरा कामावरून परत येईपर्यंत ते बाहेरच राहतात. या महिलेने इंडिया टुडेला सांगितलं की, ती खिडकीतून मुलांना जेवण देत असे.

या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ही महिला घरात कैद होती. तिच्या हालचालींवर मर्यादा होत्या. कामावर जाण्यापूर्वी नवरा तिला घरात कोंडून ठेवायचा. त्याला असुरक्षित वाटायचं. त्याचं आता समुपदेशन करण्यात आलं आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळ गाठून महिलेची सुटका केली. महिलेचंही समुपदेशन करण्यात आलं आहे. 
 

Web Title: mysuru husband kept wife locked inside house for 12 years and tortured-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.