पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी बेपत्ता, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:45 PM2019-04-19T16:45:18+5:302019-04-19T16:46:27+5:30

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nadia District Nodal Election Officer Arnab Roy is reportedly missing | पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी बेपत्ता, तक्रार दाखल

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी बेपत्ता, तक्रार दाखल

googlenewsNext

कोलकाता - पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना राज्यातील नादिया जिल्ह्यातील एक निवडणूक अधिकारीच बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



 

मिळालेल्या माहितीनुसार नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी अर्णब रॉय हे निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीपासून बेपत्ता आहेत. काल दुपारपासूनच त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही. तसेच त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे उघड झाले आहे. अर्णब रॉय यांच्या संदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या वाहनचालकाचीही चौकसी केली आहे. 





अर्णब रॉय हे बिप्रसाद चौधरी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणुकीचे काम पाहण्यासाठी केले होते. त्यानंतर दुपारी भोजनाच्या वेळेपासूनच ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रभारी होते. 

Web Title: Nadia District Nodal Election Officer Arnab Roy is reportedly missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.