नाफेड-सरकार करणार कांदा खरेदी-गडकरी
By Admin | Published: August 11, 2016 04:44 AM2016-08-11T04:44:07+5:302016-08-11T04:44:07+5:30
महाराष्ट्रात खरेदीअभावी पडून असलेल्या कांद्याची नाफेड आणि राज्य सरकार प्रत्येकी ५0 टक्के खरेदी करणार असून या संदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा प्रस्ताव येता
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
महाराष्ट्रात खरेदीअभावी पडून असलेल्या कांद्याची नाफेड आणि राज्य सरकार प्रत्येकी ५0 टक्के खरेदी करणार असून या संदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा प्रस्ताव येताच त्यास विनाविलंब मंजुरी देऊन राज्यात कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य व केंद्राच्या उपस्थितीत नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात घेण्यात आला.
नितीन गडकरींसह केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, पुरवठा मंत्री रामविलास पासवान, माजी कृषीमंत्री शरद पवार, राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह महाराष्ट्राचे जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, दिलीप गांधी, हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, संजय पाटील, हिना गावीत, रक्षा खडसे आदी बैठकीस उपस्थित होते.
कांदा नाशवंत असल्याने तो पडून राहिला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यासाठी बंद पडलेली कांदा खरेदी लवकर सुरू करावी, अशी मागणी झाली. त्यानुसार कांदा त्वरित खरेदीचे सूत्र ठरल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.