‘नागा करार अहंकाराचे प्रतीक’

By admin | Published: August 6, 2015 10:47 PM2015-08-06T22:47:19+5:302015-08-06T22:47:19+5:30

मोदी सरकारविरुद्ध कमालीच्या आक्रमक झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी नागा शांतता करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले

'Naga agreements symbolize ego' | ‘नागा करार अहंकाराचे प्रतीक’

‘नागा करार अहंकाराचे प्रतीक’

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारविरुद्ध कमालीच्या आक्रमक झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी नागा शांतता करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने नागा शांतता करार केला. यातून मोदी सरकारचा ‘अहंकार’च दिसतो, अशी टीका त्यांनी केली.
सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेस व अन्य काही विरोधी पक्षांनी सलग तिसऱ्या दिवशीही संसदेबाहेर धरणे दिले. यावेळी बोलताना सोनियांनी मणिपूर, आसाम व अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांचा आवाज दडपला जात असल्याची टीका केली. त्या म्हणाल्या की, ज्या राज्यांवर या कराराचा परिणाम होणार आहे, त्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सरकारने विश्वासात घेतले नाही, ही गंभीर बाब आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Naga agreements symbolize ego'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.