नागालॅण्डच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा
By admin | Published: February 11, 2017 01:04 AM2017-02-11T01:04:25+5:302017-02-11T01:04:25+5:30
नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. जेलियांग यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा आदिवासी समूहांनी दिला आहे
कोहिमा : नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. जेलियांग यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा आदिवासी समूहांनी दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला या आदिवासींनी विरोध केला आहे. त्या प्रकरणात राज्यात हिंसाचारही झाला. या पार्श्वभूमीवर या समूहांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. ती शुक्रवारी संपली.
नागालँड जनजाती कृती समिती, संयुक्त समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे नैतिक आधारावर राजीनामा मागितला आहे. असे न केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा या समूहांनी दिला आहे. काही भागात झालेला हिंसाचार, काही लोकांचा झालेला मृत्यू, जखमी होणे आणि संपत्तीचे झालेले नुकसान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे हीच कारवाई ठरू शकेल, असेही या संघटनांनी म्हटले आहे.