Nagaland Election Result 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:56 PM2023-03-02T19:56:35+5:302023-03-02T20:01:46+5:30

Nagaland Election Result 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आनंदाची बातमी आहे. नागालँडमधील सायंकाळ सहापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने येथे सहा जागा जिंकल्याआहेत. 

nagaland election result 2023 sharad pawar ncp republican party of india athawale performance | Nagaland Election Result 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय

Nagaland Election Result 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय

googlenewsNext

Nagaland Election Result 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आनंदाची बातमी आहे. नागालँडमधील सायंकाळ सहापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने येथे सहा जागा जिंकल्याआहेत. 

दुसरीकडे,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दोन जागा जिंकल्या आहेत. आकडेवारीनुसार, नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला बहुमत मिळाले आहे. ६० जागांपैकी ३७ जागांवर विजयी होताना दिसत आहे. यामध्ये एनडीपीपीला २५ तर भाजपला १२ जागा मिळत आहेत. येथे सरकार स्थापनेसाठी ३१ जागांची आवश्यकता आहे.

२०१८ चा निकाल काय?

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ६ जागांवर निवडणूक लढवली, पण एकही जागा जिंकता आली नाही. सर्व जागांवर डिपॉझिट जप्त झाले. दुसरीकडे भाजपने २० जागांवर उमेदवार उभे केले आणि त्यापैकी १२ जागा जिंकल्या. काँग्रेसने १८ जागा लढवल्या होत्या, मात् काँग्रेसने एकही जागाव जिंकली नाही. 

कोणाला किती मते मिळाली?

चिराग पासवान यांच्या पक्ष लोक जनशक्ती पार्टीला राज्यात २ जागा मिळाल्या, तर चार अपक्ष उमेदवारही निवडणुकीत विजयी झाले. नागा पीपल्स पार्टीही २ जागांवर आघाडीवर आहे. संध्याकाळी ५.३० वाजताच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या टक्केवारीनुसार एनडीपीपी ३२.३३ टक्के मतांसह पहिल्या स्थानावर आहे, तर मित्रपक्ष भाजपला १८ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस ३.५४ टक्क्यांवर घसरली आहे. 

Web Title: nagaland election result 2023 sharad pawar ncp republican party of india athawale performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.