देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 09:36 AM2020-07-04T09:36:23+5:302020-07-04T09:38:19+5:30

कुत्र्याच्या मांसची खरेदी-विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

nagaland government bans trade and sale of dog meat | देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी

देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी

googlenewsNext

कोहिमा - भारतातील काही राज्यांमध्ये कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं. मात्र आता नागालँड सरकारने राज्यात अशा प्रकारचं मांस विकण्यास बंदी  घातली आहे. कुत्र्याच्या मांसची खरेदी-विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. प्राण्यांसोबत होणारी क्रूरता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्‍याचे मुख्‍य सचिव तेमजेन तॉय यांनी ही माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 

नागालँडमध्ये कुत्र्याचं शिजवलेलं आणि कच्च अशा दोन्ही प्रकारच्या मांसवर बंदी घालण्यात आली आहे. दुसऱ्या राज्यातून कुत्रे आणताना असणारा धोका आणि Animal Cruelty Prevention Act 1960 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाचं लोकांनी स्वागत करायला पाहिजे असं मत देखील तॉय यांनी व्यक्त केलं आहे. अनेक राज्यांमध्ये कुत्र्यांचं मांस हे उच्च प्रोटिन असलेलं समजलं जातं. त्यामुळे लोक ते मांस खात असल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने कुत्र्याच्या मांस विक्रीकडे संशयाने पाहिलं जात होतं. काही दिवसांपूर्वीच कुत्र्याला क्रुरपणे मारतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी त्या विरुद्ध आवाज उठवला होता. या सगळ्या घटनानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

 

Web Title: nagaland government bans trade and sale of dog meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.