...अन् एका रात्रीत 'त्या' रिक्षावाल्याचं नशीबच पालटलं; लागली 50 लाखांची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:35 AM2019-10-02T09:35:04+5:302019-10-02T09:35:23+5:30
रिक्षावाल्याला नागालँडमध्ये 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.
गुवाहाटीः कोणाचं नशीब कधी बदलेल याबाबत काहीही सांगता येत नाही. पश्चिम बंगालमधला एक रिक्षावाला हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका करत होता. त्याच रिक्षावाल्याला नागालँडमध्ये 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. 50 लाखांची लॉटरी लागल्यानं तो रिक्षावाला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. पश्चिम बंगालमधल्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गुस्करामध्ये वास्तव्याला असलेल्या गौर दास यांना रविवारी नागालँड सरकारची स्टेट लॉटरी लागली.
मीडिया रिपोर्टनुसार, दास आणि त्याच्या संघटनेची माणसं नागालँडला पिकनिकला जाण्याच्या तयारीत होते. परंतु मुसळधार पावसामुळे त्यांची पिकनिकच रद्द झाली. त्याचदरम्यान एका लॉटरी विक्रेत्यानं दास यांच्यावर तिकीट खरेदी करण्याचा दबाव टाकला, त्यानंतर घरी परतत असतानाच त्यांनी लॉटरीचं तिकीट काढलं.
- तिकीट खरेदी करण्यासाठी लॉटरी विक्रेत्यानं टाकला होता दबाव
खरं तर गौर दास यांना लॉटरीचं तिकीट खरेदी करायचं नव्हतं, परंतु लॉटरी विक्रेत्यानंच त्याच्यावर तिकीट खरेदी करण्यासाठी दबाव टाकला. दास सांगतात, माझ्याकडे फक्त 70 रुपये होते आणि त्याचदरम्यान लॉटरी विक्रेत्यानं तिकीट घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी ते तिकीट खरेदी केलं. रविवारी दुपारी दास एका दुकानावर लॉटरीचा रिझल्ट पाहण्यासाठी आले असता, त्यावेळी त्यांना लॉटरीच्या स्वरूपात 50 लाखांचं बक्षीस लागल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सोमवारी त्यांनी तिकीट बँकेत जमा केलं. माझी आई आणि पत्नी मजुरी करायचे, असंही ते रिक्षावाले सांगतात. दास यांना दोन मुली आणि एक मुलगासुद्धा आहे. एवढ्याशा पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा दास यांना काहीसं कठीण जात होतं. त्यातच त्यांना ही लॉटरी लागल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.