या राज्याच्या निर्मितीपासून एकही महिला आमदार झालेली नाही! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 01:44 PM2018-02-13T13:44:46+5:302018-02-13T13:45:44+5:30

विधानसभा निवडणुकीत राजकीय पार्टीच्या सर्व उमेदवारासोबत 257 अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

nagaland-women-could-not-reach-assembly-since-55-years | या राज्याच्या निर्मितीपासून एकही महिला आमदार झालेली नाही! 

या राज्याच्या निर्मितीपासून एकही महिला आमदार झालेली नाही! 

Next

नवी दिल्ली - सध्या भारतातील काही राज्यांमध्ये निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. नागालँडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पार्टीच्या सर्व उमेदवारासोबत 257 अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  यामध्ये पाच महिलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

स्थानिक राजकरणामध्ये अशी चर्चा आहे की यावेळी निवडणूकीत महिला नवीन ट्रेंड आणू शकतात. कारण 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत यावेळी जास्त महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 2013 मध्ये फक्त दोन महिलांनी नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

नागालँड राज्याची निर्मीती 1963मध्ये झाली तेव्हापासून आजतागत विधानसभा निवडणूकीत एकही महिला उमेदवार निवडणून आली नाही. धक्कादाक गोष्ट अशी की या 55 वर्षांत नागालँडमध्ये फक्त 30 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 1977मध्ये रानो एम शाइदा लोकसभामध्ये निवडणून आली होती. तेव्हापासून आजतागत एकही महिला विधानसभा किंवा लोकसभामध्ये गेलेली नाही. 

यावेळी विधानसभासाठी उमेदारी दाखल केलेल्या अवान कोनयक म्हणातात की, महिला विधानसभापर्यंत पोहचल्या नाहीत. त्यासाठी पुरुषांना दोष देण्यात काही अर्थ नाही. यासाठी महिलाच जबाबदार आहे. महिला नागालँडच्या राजकारणामध्ये पुढे आल्या नाहीत. पण आता वेळ बदलली आहे, महिलांनी राजकारणात प्रवेश करायाला हवा. पुढे त्या म्हणाल्या की, माझ्या तिन्ही भावांना वाटलं असते तर ते निवडणूकीत उतरले असते, पण नागालँडच्या जनतेचं समर्थन पाहून यावेळी मी निवडणूकीच्या रणगंनात उतरली आहे. अवान कोनयक ह्या नागालँडचे माजी शिक्षणमंत्री न्येईवांग कोनयक यांच्या कन्या आहेत.  दिल्ली विद्यापिठातून त्यांनी एमएची पदवी घेतली आहे. त्या डॅमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 

Web Title: nagaland-women-could-not-reach-assembly-since-55-years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.