नागालँडचा 'अशांतता क्षेत्र' दर्जा सहा महिन्यांनी वाढवला; केंद्रीय गृहमंत्रालयाची अधिसूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:02 AM2020-12-31T11:02:44+5:302020-12-31T11:06:12+5:30
नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
नवी दिल्ली : नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडूननागालँड अशांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
नागालँडमधील परिस्थिती सामान्य होताना दिसत नाही. नागालँड अद्यापही धोकादायक स्थिती आहे. त्यामुळे नागालँडमध्ये लागू असलेला सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा पुढेही कायम राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सामान्य जनतेच्या मदतीसाठी सशस्त्र दलाचा विशेष अधिकार कायदा लागू राहणे गरजेचे आहे. आगामी सहा महिन्यांसाठी नागालँडचा अशांतता क्षेत्रचा दर्जा कायम राहणार आहे, असे त्यात म्हटले आहे.
गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागालँडमधील विविध भागात अजूनही हत्या, लूट, दरोडा, खंडणी सुरू आहे. ईशान्य भारतासह जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात लागू असलेला 'एएफएसपीए' मागे घेण्याची मागणी वाढत आहे, असेही ते म्हणाले.