नगरपंचायत निवडणूक मतदार यादीवरून प्रशासकीय यंॠनेवर ताशेरे

By admin | Published: December 7, 2015 12:02 AM2015-12-07T00:02:51+5:302015-12-07T00:02:51+5:30

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच विविध शंका उलटसुलट चर्चेने वादग्रस्त बनली असतानाच प्रारूप मतदार यादीवर हजारावर आलेल्या हरकती बघता प्रशासकीय यंॠणेवर चांगलाच ताण पडत तदनंतर प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीतही अनेकांचे समाधान न झाल्याने यंत्रणेला लोकांचे दुषणे खाण्याची वेळ आली आहे . यापूर्वी ग्रामपालिका ंची निवडणूक होत असताना वार्ड पद्धतीने होत तीन उमेदवार उभे राहत होते त्यावेळी मतदार यादी बनविताना जुने गावठाण व नवीन वसाहत यातील घरांप्रमाणे नकाशे होत मतदार यादी राहत होती त्यामुळे बहुतांशी वस्तीवर राहणार्‍या नागरिकांचे मतदान त्यांच्या पूर्वीच्या राहत असलेल्या गावातील परंपरागत वार्डात होते . मात्र यंदा नगरपंचायती साठी नव्याने प्रभाग रचना होत प्रगनक गट तयार करत गुगल म्यप द्वारे प्रभाग नकाशे तयार करत नकाशाप्रमाणे सद्या जे नागरिक

Nagar Panchayat elections on the administrative system from the electoral rolls | नगरपंचायत निवडणूक मतदार यादीवरून प्रशासकीय यंॠनेवर ताशेरे

नगरपंचायत निवडणूक मतदार यादीवरून प्रशासकीय यंॠनेवर ताशेरे

Next
ंडोरी : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच विविध शंका उलटसुलट चर्चेने वादग्रस्त बनली असतानाच प्रारूप मतदार यादीवर हजारावर आलेल्या हरकती बघता प्रशासकीय यंॠणेवर चांगलाच ताण पडत तदनंतर प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीतही अनेकांचे समाधान न झाल्याने यंत्रणेला लोकांचे दुषणे खाण्याची वेळ आली आहे . यापूर्वी ग्रामपालिका ंची निवडणूक होत असताना वार्ड पद्धतीने होत तीन उमेदवार उभे राहत होते त्यावेळी मतदार यादी बनविताना जुने गावठाण व नवीन वसाहत यातील घरांप्रमाणे नकाशे होत मतदार यादी राहत होती त्यामुळे बहुतांशी वस्तीवर राहणार्‍या नागरिकांचे मतदान त्यांच्या पूर्वीच्या राहत असलेल्या गावातील परंपरागत वार्डात होते . मात्र यंदा नगरपंचायती साठी नव्याने प्रभाग रचना होत प्रगनक गट तयार करत गुगल म्यप द्वारे प्रभाग नकाशे तयार करत नकाशाप्रमाणे सद्या जे नागरिक जेथे वास्तव्यास आहेत तेथे त्यांचे नावे समाविष्ठ करण्यात आले . या रचनेला अनेकांनी हरकत घेत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयीन प्रक्रि या सुरु असतानाच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत निवडणूक कार्यक्र म सुरु राहिला आहे .दरम्यान सदर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच दिवाळीच्या दिवशी सायंकाळी यादी फुटल्याची चर्चा होत इच्छुकांनीआपल्या सोयीप्रमाणे मतदार समाविष्ट केल्याचे सांगितले जावू लागले अखेर यादी प्रसिद्ध होताच अनेक मतदारांचे नावे या प्रभागात वास्त्याव्यास असताना दुसर्‍या प्रभागात गेले . यानंतर अनेक नागरिकांनी हरकती घेतल्याने तब्बल हजारापर्यंत हरकती आल्या . काही मतदार यांचे घरे दोन तीन ठिकाणी असल्याने त्यांना नेमके कोणत्या प्रभागात ठेवायचे याचा पेच प्रशासनालाही पडला त्यावर कडी म्हणजे काही मतदारांनी तात्पुरते वास्तव्य ठिकाणच बदलल्याने प्रशासनाची चांगलीच कसोटी लागली . या हरकतींवर तलाठी हे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करत निर्णय घेतील असे प्रशासकीय यंत्रणेने सांगितले मात्र पुन्हा अंतिम यादी प्रसिद्ध होताना काही त्रृटी राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर अनेकांनी संशय व्यक्त करत पुन्हा अर्ज निवेदने दिले आहे . प्रभाग बारा मध्ये जाधव परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात हरकत नाट्य घडत तेथे मोठी उलथापालथ झाली मात्र यातही पारदर्शकता नसल्याचा आरोप दोन्ही बाजूने होत असतानाच इतर काही प्रभागात हरकतींवर काटेकोर पणे निकाल दिला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे . प्रभाग एक च्या नकाशातील एक संपूर्ण कुटुंब येत असताना त्यांना या प्रभागात घेण्याचा अर्ज फेटाळण्यात आला तर काही प्रभागात काही नागरिक प्रभागात राहत नसताना त्यांचे नाव कायम राहिले तर काहींचे या प्रभागातून दुसर्या प्रभागात गेले .राजकीय दबावातून यादी तयार झाल्याचा आरोप अनेकजण एकमेकावर करत असताना नेमका कुणाचा दबाव हे मात्र स्पष्ट झालेले नसून प्रशासन मात्र यामुळे आम जनतेच्या दृष्टीने संशयाच्या भोवर्यात सापडले असून मंडळ अधिकारी व काही तलाठी नगरपंचायत कर्मचार्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले असून आता निवडणूक कार्यक्र म घोषित झाल्याने हा वाद काहीसा शमला असला तरी निवडणूक निकालानंतर त्याचे कवित्व गायले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . आता सर्वच इच्छुक प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादी नुसार मताचा जोगवा मागण्यात सुरवात केली आहे

Web Title: Nagar Panchayat elections on the administrative system from the electoral rolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.