पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी केला नागिण डान्स, Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 01:21 PM2020-11-17T13:21:14+5:302020-11-17T13:23:22+5:30
Police Dance Video : पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - देशभरात दिवाळी आनंदात साजरी केली जात आहे. याच दरम्यान पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बिहारमधीलपोलिसांचा नागिण डान्स तुफान व्हायरल होत आहे. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार जिल्ह्यातील नवादा परिसरात ही घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नागिण डान्स करून ठुमके लगावले आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विविध गाण्यांवर नाचताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांपासून हवालदारांपर्यंत अनेकजण डान्स करत होते.
अधिकाऱ्यांनी देखील हा व्हायरल झालेला व्हिडीओ पोलीस ठाण्यातील असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत हा प्रकार घडल्याचं म्हटलं आहे. गस्त घालण्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस ठाण्यात अशा प्रकारे डान्स सुरू असल्याने त्यावर टीकेची झोड उठली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फटाके पेटवताना त्यांची नात गंभीर जखमी झाली होती. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
फटाके पेटवताना चिमुकली गंभीर जखमी झाली होती, मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा https://t.co/ycXm7LGV6F#BJP#ritabahugunajoshi
— Lokmat (@MiLOKMAT) November 17, 2020
भाजपा खासदारांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाक्याने भाजल्यामुळे मृत्यू
रीता बहुगुणा जोशी या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. तसेच तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. जोशी यांच्या नातीला मंगळवारी सकाळीच एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.
ती रडत होती... जोरजोराने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटत होती; जाणून घ्या नेमकं झालं काय?https://t.co/bD93CzNxiw#Police
— Lokmat (@MiLOKMAT) November 14, 2020