मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी
By admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:02+5:302016-03-15T00:34:02+5:30
जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
Next
ज गाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. उमवितील विचारधारा प्रशाळेंतर्गत कार्यरत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन वसंशोधनकेंद्राच्यावतीनेसोमवारी सकाळी अधिसभा सभागृहात मंजुळे यांचा मी, कविता आणि चित्रपट या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम, कुलसचिव अशोक महाजन, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.आशुतोष पाटील उपस्थित होते. दोन्ही पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावीसियाचीनमध्ये सैनिकांना वीरमरण आले. भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तेथे जाऊन एक रात्र कर्तव्य करावे... मग सीमा प्रश्न कसा सुटत नाही, ते पहा, असेही नागराज मंजुळे उपहासाने म्हणाले. मंदिरात जातो, पण बांधकाम पाहायलामी मंदिरात देवदर्शनासाठी जाणे कधीच सोडून दिले. मंदिरांमध्ये गेले तर तेथील बांधकाम पाहतो. माझ्या पूर्वजांनी मोठे कष्ट घेऊन मंदिरे बांधली. त्यांनी असे सुंदर बांधकाम कसे केले असेल, असे प्रश्न मला पडतात. मंदिरांना लावलेल्या दगडांना हात लावून मला आनंद मिळतो. पण आपण जुन्या मंदिरांना रंग मारून आपली भलावण करून घेण्यात मोठेपण मानतो... हा विचार बदलायला हवा, असेही मंजुळे म्हणाले. जसे बाबासाहेब मंदिरात गेले, तसे शनिदेवाचे दर्शन घ्याअलीकडे शनिदेवाच्या दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला जातो. महिलांनी शनिदेवाचे दर्शन घ्यायला हवे. कुठलीही भीती ठेवू नका, जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंदिरात दर्शनासाठी गेले, तसे जाऊन दर्शन घ्या, असेही नागराजमंजुळे म्हणाले. देशद्रोह, शनिचौथर्यापेक्षा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचामुलांनी देशद्रोह केला...., शनिचौथर्यावर जाऊन दर्शन घेतले असे प्रश्न सध्याचर्चेत आहे. पण अजूनही काही गरिबांची मुले क्षयरोगाने मृत्यू पावत आहेत. आपल्या मुलाबाळांना क्षय रोग आहे हे अजूनही अनेक गरिबांना माहीत होत नाही... ते त्यांना उपचारासाठी नेऊ शकत नाहीत. अनेक कुटुंबांना वन्य प्राणी खाऊन जगावे लागते. ही स्थिती अजूनही आहे. हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्नही नागराज मंजुळे यांनी केला.