नायडू विरुद्ध गांधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:56 AM2017-07-18T03:56:45+5:302017-07-18T03:56:45+5:30

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपाने केंद्रीय नगरविकास तसेच माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांची निवड केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे तेच उमेदवार असतील.

Naidu against Gandhi! | नायडू विरुद्ध गांधी!

नायडू विरुद्ध गांधी!

Next

- हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपाने केंद्रीय नगरविकास तसेच माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांची निवड केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे तेच उमेदवार असतील. काँग्रेससह १८ विरोधी पक्षांनी या पदासाठी महात्मा गांधी यांचे नातू व माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे. नायडू उद्या, मंगळवारी सकाळीच आपला अर्ज सादर करणार आहेत.
भाजपा संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याखेरीज महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव व केरळचे खासदार ओ. राजगोपाल यांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र भाजपा व रालोआचे बहुमत नसलेल्या राज्यसभेचे कामकाज नीट हाताळण्यासाठी वेंकय्या नायडू यांचे नाव निश्चित झाले.
स्वत: नायडू यांची उपराष्ट्रपती होण्याची इच्छा नव्हती. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, तेव्हाच त्यांनी मला राष्ट्रपती वा उपराष्ट्रपती व्हायचे नाही, असे पक्षनेतृत्वाला सांगितले होते. मात्र आज सकाळी काही नेत्यांनी संसद भवनात त्यांचे अभिनंदन केले, तेव्हा काहीही न बोलता त्यांनी त्याचा स्वीकारही केला.

योग्य उमेदवार : मोदी
उपराष्ट्रपतीपदासाठी वेंकय्या नायडू हेच योग्य उमेदवार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नायडू यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, मी नायडू यांना अनेक वर्षे ओळखतो.
ते अतिशय प्रामाणिक व कष्टाळू नेते आहेत. राज्यसभेचे सभापती म्हणूनही ते उत्तम कार्य करतील. मंत्री म्हणून त्यांनी केलेले कामही सर्र्वाच्या लक्षात राहणारे आहे.

बैठकीलामोदी उपस्थित..
भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये वेंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा केली. शहा म्हणाले की संसदीय मंडळाने एकमताने नायडू यांचे नाव निश्चित केले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते.

आंध्र ते दिल्ली ..
नायडू प्रथम १९७८ आणि १0८३ साली आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले.
१९९३ मध्ये पक्षाचे सरचिटणीस झाले व राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. नायडू यांनी आतापर्यंत गृह, अर्थ, कृषी, संसदीय कामकाज तसेच परराष्ट्र व्यवहार या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे.

भाजपाला विजयाची खात्री..
वेंकय्या नायडू सहजपणे निवडून येऊ शकतील. राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहांतील ७७६ सदस्यांपैकी ५५0 मते नायडू यांना मिळतील, अशी खात्री भाजपाच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Naidu against Gandhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.