नाईक यूपीचे, कोहली गुजरातचे राज्यपाल

By admin | Published: July 15, 2014 02:53 AM2014-07-15T02:53:41+5:302014-07-15T02:53:41+5:30

नरेंद्र मोदी सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदांची ‘बक्षिसी’ देण्यास सुरुवात केली

Naik UP, Kohli, Governor of Gujarat | नाईक यूपीचे, कोहली गुजरातचे राज्यपाल

नाईक यूपीचे, कोहली गुजरातचे राज्यपाल

Next

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदांची ‘बक्षिसी’ देण्यास सुरुवात केली असून, त्याअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना उत्तर प्रदेशचे तर पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ़पी़ कोहली यांना गुजरातचे राज्यपालपद देण्यात आले आहे़
राष्ट्रपती भवनाने राज्यपालांच्या नियुक्त्यांची माहिती जारी केले आहे़ त्यानुसार राम नाईक उत्तर प्रदेशचे, ओ़पी़ कोहली यांना गुजरातचे, माजी विधानसभा अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठी यांना पश्चिम बंगालचे तर बलराम दास टंडन छत्तीसगडचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे़ नाईक हे गांधी घराण्याचे निकटस्थ समजले जाणारे बी़एल़ जोशी यांची जागा घेतील़ मोदी सरकारच्या निर्देशानंतर राज्यपालपदाचा राजीनामा देणारे जोशी हे पहिले राज्यपाल होते़ तीनदा खासदार राहिलेले ८० वर्षीय नाईक यांनी १९९४ मध्ये कर्करोगासारख्या आजारावर मात केली होती़ २०१३ मध्येच आपण २०१४ ची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा त्यांनी केली होती़ १९९४ ते २००० पर्यंत राज्यसभा सदस्य राहिलेले ७८ वर्षीय कोहली हे कमला बेनीवाल यांची जागा घेतील़ मोदी सरकारने बेनीवाल यांना यावर्षी नोव्हेंबरपर्यंतच्या त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी मिझोरमचे राज्यपाल म्हणून पाठवले आहे़ केसरीनाथ त्रिपाठी हे पश्चिम बंगालमध्ये एम़ के. नारायणन यांची जागा घेतील़ अनेक साहित्य रचना करणारे त्रिपाठी यावर्षी नोव्हेंबरमध्ये ८० वर्षांचे होत आहेत़ बलरामदास टंडन यांना छत्तीसगडचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे़

Web Title: Naik UP, Kohli, Governor of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.