नाईक यांच्या भाषणांची तपासणी होणार
By Admin | Published: July 9, 2016 02:38 AM2016-07-09T02:38:13+5:302016-07-09T02:38:13+5:30
इस्लामचे प्रवचनकर्ते डॉ. जाकीर नाईक यांच्या भाषणांच्या सीडीची तपासणी आवश्यक त्या कारवार्ईसाठी केली जाईल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी म्हटले. ते म्हणाले
नवी दिल्ली : इस्लामचे प्रवचनकर्ते डॉ. जाकीर नाईक यांच्या भाषणांच्या सीडीची तपासणी आवश्यक त्या कारवार्ईसाठी केली जाईल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी म्हटले. ते म्हणाले, दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
नाईक यांच्या भाषणांतून दोन समाजात द्वेष निर्माण होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नाईक यांच्या भाषणांची दखल आम्ही घेतली असून, त्यांची चौकशी करावी अशा सूचना दिल्या आहेत. भाषणांची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे राजनाथ सिंह येथे कार्यक्रमासाठी आले असताना वार्ताहरांशी
बोलताना म्हणाले. सरकारचा जिथपर्यंत संबंध आहे तेथपर्यंत
आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादावर तडजोड करणार नाही. जे न्याय आहे ते केले जाईल, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रविशंकर प्रसाद-झाकीर नाईक होते एका व्यासपीठावर
दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी भाजपाचे राजनाथ सिंह यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, याबाबतचा खुलासा झाला पाहिजे की, राजनाथ सिंह आणि मालेगाव प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्यात २००८ मध्ये चर्चा झाली होती. रविशंकर प्रसाद आणि झाकीर नाईक हेही एका व्यासपीठावर आले होते. त्याबाबत भाजपने खुलासा करावा. या दोन भाजप नेत्यांच्या प्रकरणावर हा पक्ष गप्प का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.