नितीश कुमारांवरही हत्येचा आरोप आहे - लालूप्रसाद यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 08:49 PM2017-07-26T20:49:07+5:302017-07-26T20:59:11+5:30
नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे.
पाटणा, दि. 26 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप आला असून सत्ताधारी जनता दल(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील महायुती अखेर 20 महिन्यानंतर तुटली आहे.
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ते म्हणाले की, नितीश कुमार यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा गंभीर आरोप आहे. ते भारतीय दंड विधान 302 चे आरोपी आहेत. त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. त्यामुळे जनता दल (यू) काही पोलीस स्टेशन नाही, स्पष्टीकरण द्यायला, असे लालूप्रसाद म्हणाले. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे आधीच ठरविले होते, असाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. दरम्यान, काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांनी एकत्र येऊन नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करावी असेही यावेळी लालूप्रसाद यादव म्हणाले.
Mahagathbandhan hai, CM resign kiye hain, teenon dalon ka meeting karke naya neta chun ke banaya jaaye: RJD chief Lalu Prasad Yadav. #Biharpic.twitter.com/Avb2EUViM0
— ANI (@ANI_news) July 26, 2017
गेल्या काही दिवसांमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. मात्र, तेजस्वी यादव यांचा राजीनामा देणार नसल्याचे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची, खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
Ye (Nitish Kumar) mile hue hain BJP, RSS se. Kya setting hai, PM Modi turant tweet kar diye, Nitish Kumar ko badhaai de diye: Lalu Yadav pic.twitter.com/u6GDQF2XaS
— ANI (@ANI_news) July 26, 2017